अंबाजोगाई

तीन हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेविकेवर एसीबीची कारवाई

बीड / मयत पित्याच्या नावावरील प्लॉटचा उतारा देण्यासाठी त्यांच्या मुलाकडून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पिंपळगाव घाट (ता. आष्टी) येथील ग्राम सेविकेसह अन्य एका व्यक्तीवर बीड ‘एसीबी’कडून अंभोरा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.. मयत झालेल्या पित्याच्या नावावरील प्लॉटचा उतारा देण्याची मागणी त्यांनी पिंपळगाव घाट ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेविका सोनाली अरविंद साखरे हिच्याकडे केली होती. सदर उतारा काढून देण्यासाठी सोनाली साखरे हिने त्यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. तर, खाजगी इसम चांगदेव दळवी याने देखील तक्रारदारास साखरेला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.

बीड एसीबीचे पोलीस निरिक्षक अमोल धस आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश मेहेत्रे यांनी तक्रारीची पडताळणी केली असता सोनाली साखरे हिने लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झाले. याप्रकरणी ग्रामसेविका सोनाली साखरे आणि चांगदेव दळवी या दोघांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे आणि बीडचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker