महादेव जानकर यांच्या विरोधात बालासाहेब दौडले यांचे बंड?


अंबाजोगाई / लोकनेते गोपिनाथ राव मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील संपुर्ण धनगर समाजाची शक्ती एकवटल्या साठी महादेव जानकर यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात मृतांच्या खांद्याला खांदा लावून राज्य पातळीवर नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब दौडतले यांनी जानकर यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला असून आपल्या समर्थकांसह ते यशवंत सेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
धनगर समाजाचे नेते तथा माजी मंत्री महादेव जानकर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात मोठी फूट पडल्याचे समोर येत आहे . पक्षाचे माजी महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी जानकरांची राजकीय जडणघडण झालेल्या यशवंत सेनेचा झेंडा हाती घेत त्यांच्याच बालेकिल्ल्यातील उंडवडी (जि. बारामती) येथे रविवारी महादेव जानकरांच्या रासपमध्ये मोठी फूट पाडून यशवंत सेनेचा झेंडा हाती घेण्याच्या तयारी चालू केली आहे. बालासाहेब दोडतले यांच्यासह अनेकजण बंडाच्या तयारीत आहेत.
बालासाहेब दोडतले यांनी नुकतीच एल्गार परिषद घेऊन शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय समाज पक्षाचे ७० टक्के पदाधिकारी आपल्या सोबत असल्याचा दावा बालासाहेब दोडतले यांनी केला. त्यामुळे आता पहिल्यांदाच राष्ट्रीय समाज पक्षातील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आले आहे.
धनगर समाजाचे नेते स्व बी. के. कोकरे हे संस्थापक अध्यक्ष आणि सध्या प्रा. माणिकराव दांगडे पाटील हे प्रदेशाध्यक्ष असलेल्या ‘ यशवंत सेनेची स्थापना सन १९९० साली झालेली आहे. याच संघटनेच्या सरसेनापती पदावर यांनी काम केलेले आहे त्यानंतर स्थापना केली. त्यानंतर नंतर सेनेला अंतर दिले. त्यामुळे संघटना दुर्लक्षित राहिली. जानकरांच्या पक्षाच्या जडणघडणीत योगदान असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये अंबाजोगाईचे बाळासाहेब दोडतले हे महत्वाचे नाव मानले जाते. त्यांच्याकडे महासचिव पदांची जबाबदारी होती.
तर प्रदेशाध्यक्षपदी आमदार रत्नाकर गुट्टे हे होते. या दोघांना २६ जानेवारी २०२२ रोजी पदावरून अचानक हटविले होतं. दोडतले यांच्या जागी माऊली सलगर तर गुर्डेच्या जागी काशिनाथ शेवते या फारसे परिचितही नसलेल्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे दोडतले यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षातील निष्ठावंतांचे खच्चीकरण केले जात असल्याचा सूर पदाधिकारी, कार्यकत्यांमधून समोर आला होता. याच नाराजीतून अखेर राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी महादेव जानकरांच्याच बालेकिल्ल्यातून त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. अख्खा पक्षच आपल्यासोबत असल्याचा दावा केल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बालासाहेब दोडतले यांची पुढील भूमिका काय हे काही दिवसात कळणार आहे.