![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Conch-snail-1.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/Conch-snail-1.png)
लातूर / दरवर्षी शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या नावाने संकटावर संकटं येतात, यावर्षी गोगलगायच्या रूपने नवे संकट आले। आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण पिकं गोगलगायीने फस्त के ले आहे. त्यावर अद्याप कोणते औषध नसले तरी आजच्या घडीस वाईन हे योग्य औषध असल्याचा दावा पिकावरील औषधी | बनविणाऱ्या ‘एमबीएफ’ या नामांकीत कंपनीचे कार्यकारी संचालक निलेश ठक्कर यांनी केला आहे.
यावर्षी लातूर व परिसरात गोगलगाईचे नवे संकट आले आहे. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोगलगाई सक्रिय होतात. त्या पिकांचे शेंडे (अंकुर) खाऊन पिके नष्ट करतात. लातूर जिल्ह्यात गोगलगाईंनी शिवारच्या शिवार काळे केले आहे. शेतकरी शासनाकडे ‘गोगलगायी’चा बंदोबस्त करा अशी मागणी करित आहे. मात्र, गोगलगायींना नष्ट करण्यासाठी आज तरी काही औषध नाही. गोगलगाय एकत्र करणे आणि त्या नष्ट करणे एवढच एक उपाय आहे.
शंखी गोगलगायीच्या संकटावर वाईन हा उपाय वाचा संपूर्ण बातमी माध्यम न्युज वर pic.twitter.com/F7jWSUqqxT
— Madhyam Network (@MadhyamNetwork) July 14, 2022
एमबीएफ या नामांकीत कंपनीचे कार्यकारी संचालक निलेश ठक्कर यांनी आमच्या कंपनीकडे ‘तार’ नावाचे एक औषध आहे पण ते फारसे प्रभावी नाही. पण शेतकऱ्यांनी वाईनचा वापर केला तर गोगलगायीचे संकट दूर होऊ शकते असा दावा श्री ठक्कर यांनी केला आहे. याला शास्त्रीय कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.