

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करून मुलाखतीस उपस्थीत राहण्याचे आवाहन
अंबाजोगाई नगर परिषद निवडणुक 2022-23 च्या अनुषंगाने नगर परिषद निवडणुकीसाठी नंदकिशोर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील “अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी” स्थापन करण्यात आली असून नगर परीषदेसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करुन मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आव्हान आघाडी प्रमुख नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे .
अंबाजोगाई नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत शहरातील एकुण 15 प्रभागातून 31 नगरसेवकांची निवडणूक होत आहे. प्रत्येक प्रभागातून वॉर्ड मध्ये आघाडी तर्फे न. प. निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिनांक 13 जुलै 2022 ते 16 जुलै 2022 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज नंदकिशोर मुंदडा यांचे “अक्षय” बँक कॉलनी रिंग रोड अंबाजोगाई या निवासस्थानी येथे सादर करावेत.
अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी 18 जुलै 2022 रोजी दुपारी 1 वाजता “आई निवास”बीड रोड येथे मुलाखती होतील या मुलाखतीसाठी सुध्दा इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन अंबाजोगाई शहर परिर्वतन जनविकास आघाडीचे वतीने करण्यात आले आहे.