मांजरा धरणात फक्त ९९.०४६ दलघमी पाणी साठा; धरण भरण्यासाठी खुप मोठ्या पावसाची आवश्यकता!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/manjara-dharan.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/manjara-dharan.png)
बीड-लातुर-उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील शेकडो गावांची तहान भागवणा-या केज तालुक्यातील मांजरा धरणात फक्त ९९.०४६ दलघमी एवढाच पाणी साठा जमा झाला आहे. मांजरा धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०९ दलघमी एवढी असून धरण भरण्यासाठी अजूनही मांजरा धरण क्षेत्रात खुप मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
यावर्षी उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने धोका दिला तर जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरु होणारा पावू चक्क जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु झाला, या सर्वांचा परिणाम बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांची तहान भागवणा-या मांजरा धरणाच्या जलाठ्यावर झाल्याचे दिसून येते आहे.
गेली आठवडाभरापासून या विभागात सतत संतत धार असल्यामुळे मांजरा धरणातील पाणी किती वाढले यांची उत्सुकता बीड जिल्ह्यातील नागरिकांना लागून राहिली आहे. या संदर्भात मांजरा धरणातील पाण्याची सद्द स्थिती जाणून घेण्यासाठी मांजरा धरणाच्या देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेले उप अभियंता अभिजित नितनवरे यांच्याशी संपर्क साधुन अधिकृत माहिती जाणून घेतली.
मांजरा धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०९३ दलघमी. एवढी आहे. आज १२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मांजरा धरणात फक्त ९९.०४६ दलघमी एवढा पाणी साठा जमा झाला आहे. मांजरा धरणाचा मृत साठा ४७.१३० दलघमी एवढा आहे तर उपयुक्त पाणीसाठा १७६.९६ दलघमी. एवढा आहे. मांजरा धरणातील सध्याचा पाणी साठा पाहिला तर मांजरा धरण भरण्यासाठी अजूनही
१२५.०४४ दलघमी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.
मांजरा धरणात सध्या पाण्याची एकुण आवक३.३०६ दलघमी एवढी आहे.
तर पाणी पातळी ६३८.४५ मी. एवढी आहे. मांजरा धरणात १० व ११ जुलै रोजी पाण्याचा येवा हा शुन्य होता तर १२ जुलै रोजी हा ऐवा१.३२३ तर १३ जुलै १.९८३ एवढा होता.
मांजरा धरणातील पाणी पातळी वाढण्यास १२ जुलै रोजी सुरुवात झाली आहे. ११ जुलै रोजी मांजरा धरणात फक्त २७.४७ टक्के पाणी साठा होता तो १२ जुलै रोजी२८.२२ टक्यावर जावून पोहोचला, आज १३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा पाणीसाठा २९.३४ टक्यांपर्यंत येवून पोहोचला आहे. मांजरा धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात अजूनही खुप मोठ्या पावसाची गरज आहे.