अध्यात्माने जीवन सार्थक व निरोगी बनते – राजयोगिनी संतोषदीदी


अंबाजोगाई : अध्यात्माने जीवन सार्थक व निरोगी बनते. यासाठी अध्यात्माची कास धरा, व जीवन निरोगी व आनंददायी बनवा. असे आवाहन माउंटआबू येथील ब्रह्माकुमारीज जागतिक मुख्य केंद्राच्या प्रशासिकाराजयोगिनी संतोषदीदी यांनी केले. अंबाजोगाई येथील प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्राच्या नव्याने बांधलेल्या “आनंद सरोवर” भवनाचे उदघाटन रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमास माउंट आबू (राजस्थान) येथील ब्रह्माकुमारीज जागतिक मुख्य केंद्राच्या प्रशासिका राजयोगिनी संतोष दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आनंद सरोवर भवनाचे उदघाटन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवा केंद्राच्या प्रमुख सुनिता बहेन, बीके महानंदा बहेन यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी बोलताना राजयोगिनी संतोष दीदी म्हणाल्या की प्रत्येकाने, स्वतः मध्ये बदल घडवला तर जगातही बदल घडेल, आपला जन्म हा देवाची देण आहे. त्यामुळे सुखी व आनंदी जिवणासाठी चिंतन करणे आवश्यक आहे. देवाचे जे श्रेष्ठ गुण आहेत, ते आपण धारण केले पाहिजेत. अध्यात्माने जीवन सार्थक व निरोगी बनते. या निरोगिपणासाठी राजयोगाचा नियमीत अभ्यास करावे लागेल. या आनंद सरोवरातून बाहेर पडल्यानंतर इथला आनंद इतरांनाही द्यावा. अशी अपेक्षा राजयोगिनि संतोष दीदी यांनी व्यक्त केली.
यांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात व्यापारी नरसिंह दरगड, सचिन कात्रेला, संतोष पंचाक्षरी, कंत्राटदार लक्ष्मण देवकते, नवकेशर नृत्य ॲकॅडमीचे भीमाशंकर शिंदे, अक्षय नृत्य ॲकॅडमीचे अक्षय यादव यांचा सत्कार झाला. बीके शिल्पा बहन यांनी ईश्वरीय गीत सादर केले. बीके वंदना बहन यांनी सूत्रसंचालन केले. उदगीर सेवा केंद्राच्या प्रभारी बीके महानंदा बहन यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी बिके मंजू व बीके प्रिया यांना पुढाकार घेतला. यावेळी अंबाजोगाई सेवा केंद्रासह औरंगाबाद, अहमदपुर, जळकोट, कळंब, नांदेड, सोलापुर, रेणापुर, लातूर, औसा, चाकुर, निलंगा, केज, परळी, बार्शी, बीड, पंढरपुर, परभणी या जिल्ह्यातील ब्रम्हाकुमारी बहन व योगसाधक शिक्षक उपस्थित होते.
या उदघाटन कार्यक्रमानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन आपल्या सद्भावना व्यक्त केल्या सेवा केंद्रातर्फे त्यांना नारायणाची प्रतिमा भेट देण्यात आली.