पेरणीच्या अंतिम टप्प्यासाठी दुस-या डोससाठी संरक्षित युरीया व डीएपी खतांचा साठा खुला
खत दर : खतांचे नवीन दर जाहीर, कोणतं खत किती रुपयांना मिळणार?


खरीप हंगाम 2022 करीता युरीया खताचा 3350 मे. टन व डीएपी खताचा 2120 मे.टन संरक्षित साठा करणे बाबतचा लक्षांक निर्धारीत करून देण्यात आला होता. त्यानुसार जिल्हयामध्ये 3190.045 मे.टन युरीया व 2074 मे. टन डीएपी खताचा संरक्षित साठा करण्यात आला आहे. यापुर्वी जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीतील मान्यतेनुसार युरीया खताचा संरक्षित साठा 1010 मे.टन (30%) व डीएपी खताचा संरक्षित साठा 1485 मे.टन (70%) मुक्त करण्यात आला होता.
सद्या खरीप हंगाम अंतीम टप्पयात असल्याने डीएपी खताचा उर्वरीत सर्व 589 मे. टन खत साठा व युरीया खताचा 1010 मे. टन खत साठा विक्रीसाठी खुला करण्यास जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षेताखालील जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने मान्यता दिली आहे. यामुळे पेरणीच्या अंतीम टप्यात व दुस-या डोससाठी शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध होणार आहेत, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
खत दर : खतांचे नवीन दर जाहीर, कोणतं खत किती रुपयांना मिळणार?
खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या एका गोणीमागे म्हणजेच 50 किलोच्या बॅगमागे 600 ते 700 रुपये इतकी दरवाढ केल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DAP खतांवरील अनुदानात वाढ केल्याचं जाहीर केलं होतं, पण पंतप्रधान कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात इतर खतांच्या अनुदानाविषयीचा उल्लेख नव्हता.
त्यामुळे मग फक्त DAPचीच दरवाढ कमी होणार का, असा प्रश्न शेतकरी विचारत होते. पण, आता सरकारनं DAP (डाय-अमोनियम फॉस्फेट) सोबतच P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांचे दर कमी होणार आहे. आता आपण सरकारनं खतांसाठी जारी केलेलं अनुदान आणि कंपन्यांनी जाहीर केलेले खतांचे नवीन दर याविषयीची माहिती जाणून घेऊया.
खतांवरील अनुदानात वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) या खताच्या एका गोणीवरचं अनुदान 500 रुपयांवरून 1200 रुपयांपर्यंत वाढवलं. यामुळे सगळ्याच कंपन्यांची DAP खताची एक गोणी आता शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.