महावितरणच्या बंपर लॉटरीत निलंग्याच्या बालाजी शंकरराव यांना ईलेक्ट्रिक स्कुटर
जालना विभागातील ब्रम्हपुरीचे अम्रत रामदास दहितोंडे यांना फ्रीज


औरंगाबाद, वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि दर महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील घरगुती वीजग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ” वीज बिल भरा अन बक्षिस मिळवा ” 238 लक्की ड्रॉ बक्षिसाची सोडत आज सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले व संचालक वाणिज्य डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते काढण्यात आला. प्रादेशिक कार्यालयात स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बक्षीस निलंग्याच्या बालाजी शंकरराव यांना तर रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस जालना विभागातील ब्रम्हपुरीचे अम्रत रामदास दहितोंडे यांना मिळाला.
मराठवाडयातील वीज ग्राहकांना वेळेवर घरगुती वीज बिले देय दिनांकाच्या अगोदर भरण्याची सवय लागावी यासाठी वीज बिल भरा अन बक्षिस मिळवा ही योजना 1 जून पासून सुर करण्यात आली होती. या बक्षिसाची आॅनलाईन फेसबुक लाईव्हद्वारे औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते लकीड्रॉ काढण्यात आला.याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, संचालक वाणिज्य डॉ. मुरहरी केळे , प्रभारी मुख्य अभियंता प्रकाश जमधडे, प्रभारी महाव्यवस्थापक वित्त व लेखा श्री लक्ष्मीकांत राजेल्ली, अधिक्षक अभियंता सर्वश्री उत्क्रांत धायगुडे, प्रविण दरोली, संजय सरग, मोहन काळोगे, उप महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान श्रीमती कांचन राजवाडे, उप महाव्यवस्थापक मानव संसाधन श्री प्रविण बागूल, सहायक महाव्यवस्थापक मानव संसाधन श्रीमती शिल्पा काबरा आदींची उपस्थिती होती.
ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण त्यांना वारंवार आवाहन करते. परंतु सर्वच ग्राहक वेळेवर आपली बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत जाते. यासाठी 1 जूनपासून सुरू करण्यात आलेल्या वीज बिल भरा अन बक्षिस मिळवा योजनेत दर महिन्याला बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून एक अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाईन बिल भरल्यास 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे.
मराठवाडयात घरगुती एकूण 25 लाख ग्राहक आहेत. तर या ग्राहकांपैकी 3,23,657 ग्राहकांनी देय दिनांक अगोदर रोख स्वरूपात वीज बिलाचा भरणा केला आहे. तसेच 4,41,991 ग्राहकांनी देय दिनांक देय दिनांकाच्या अगोदर आॅनलाईन वीज बिलाचा भरणा केला आहे. असे एकूण 7,47,502 ग्राहकांनी या लकी ड्रॉ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. हा लकी ड्रॉ पुढील दोन महिने असेच चालू राहणार असून पुढील सोडत 10 ऑगस्टरोजी होणार आहे.
बक्षिस मिळालेले ग्राहक पुढील प्रमाणे : एलईडी टीव्ही मरिनबी मुनीर अहमद, शहागंज उपविभाग, औरंगाबाद , व्ही व्ही जोशी, लातूर उपविभाग, लातूर, सौ लता माधवराव वाठोरे, नांदेड शहर उपविभाग दोन, मोबाईल विजेते 9, तर 22 मिक्सर व उपविभागस्तरावर 1000 रूपयाचे उत्तेजन बक्षिस घोषित झाले. ही बक्षिस त्यांना 15 जुलै पासून बक्षिस विजेत्या ग्राहकांच्या घरी जावून देण्यात येणार आहे. यामध्ये 38 महिला बक्षिस विजेत्या ठरल्या तर 200 पुरूष बक्षिस विजेते ठरले. वीज ग्राहकांनी देयदिनांका अगोदर वीजबिल भरणा केल्यास व्याज, दंडाचा भुर्दड बसणार नाही.यासह अनेक फायदे ग्राहकांना होणार आहेत. ग्राहकांनी देय दिनांका अगोदर वीज बिल भरून पुढील भव्य बक्षिस योजनेचा लाभ घेंण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
ग्राहकांसाठी बक्षिसे
- प्रादेशिक कार्यालयात स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटर
- तीन परिमंडळातून प्रत्येकी एक एलइडी टीव्ही
- प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून दरमहा एक रेफ्रिजरेटर
- दरमहा २२ विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर
- नऊ मंडळातून – प्रत्येकी एक मोबाइल किंवा टॅब्लेट
- दरमहा मराठवाड्यातील १०१ उपविभागातून एक हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी दोन बक्षिसे वस्तू स्वरूपात
- महावितरणचे थकीत वीज बिल मुदतीपूर्वी चालू बिलासह भरणाऱ्यांनी बंपर लॉटरी स्पर्धेत सहभागी व्हावे. थकीत बिलांचा भरणा वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करणारी ही योजना आहे.
डॉ. मंगेश गोंदावले, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय