हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप
रोटरी क्लब आणि व्दारकादास मंत्री प्रतिष्ठान ने घेतला पुढाकार


शहरामधील विविध ठिकाणी हातावर पाेट भागवणाऱ्या गरजवंत व्यवसायीकांची पावसामुळे गैरसोयी होऊ नये, त्यांचा रोजगार खंडित होऊ नये म्हणून राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल आणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठाचा संयुक्तविद्यमाने साेमवारी (दि. ११) माेठ्या २५ छत्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यवसायीकांनी माेफत छत्री पावसाच्या दिवसात उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व आभार मानले.
अजाेबा यांच्या स्मरणार्थ उपक्रम: द्वारकादास मंत्री हे माझे अजाेबा आहेत. त्यांचे सामाजिक कार्यात माेठे याेगदान हाेते. त्यांच्या स्मरणार्थ साेमवारी राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रल आणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने गरजवंत छाेटे व्यवसायीकांना छत्री वाटपाचा उपक्रम राबवला आहे. – डाॅ. नितीन मंत्री, सर्वेसर्वा प्रतिष्ठान, बीड.
गरजवंतांना मदतीच्या उपक्रमात सहभाग
बीड शहरामध्ये मागील आठ वर्षापासून राेटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलद्वारे विविध उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवले आहेत. द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठान यांच्या समवेत हा गरजवंतांना मदतीच्या उपक्रमात सहभाग घेतला. व्यवसायीकांनी व्यक्त केलेले समाधान हे प्रेरणादायी आहे .