बीड जिल्हा परीषदेतील आरोग्य कर्मचारी भरती घोटाळा विधानसभेत गाजणार
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील बेकायदेशीर सेवक भरती प्रकरण विधीमंडळात गाजण्याची चिन्हे आहेत. बीडचे आ संदिप क्षीरसागर यांच्यासह इतर आमदारांनी हा घोटाळा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींचे धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सुभाष सोनवणे या दिव्यांग उमेदवाराला नियम डावलून नोकरी दिली. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी जिल्हा निवड समितीने मान्यता द्यावी लागते.
बीडच्या आरोग्य विभागाने मात्र सोनवणे ला नोकरी देताना केवळ लक्ष्मीदर्शनाचा आदर केला बाकी सगळे नियम गुंडाळून ठेवले. या सगळ्या बाबत बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी लक्षवेधी उपस्थित केली आहे.त्यांच्यासोबत मराठवाड्यातील इतरही काही आमदारांनी या विषयात प्रश्न उपस्थित केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असतानाही सीईओ अजित पवार यांना अंधारात ठेवून बेकायदेशीर काम करणाऱ्या डॉ गित्ते अँड कंपनीला सीईओ पवार का पाठीशी घालत आहेत हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.