Breaking Newsराजकारण

जावई आणि सासऱ्याचं एकमत होत नाही, फडणवीसांचं मिश्किल भाष्य

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्याबदद्ल सभागृहात Devendra Fadnavis यांनी केले अभिनंदन

विधानसभा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे (BJP) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. याबदद्ल सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना त्यांच्या निवडीने नवा रेकॉर्ड स्थापन झाल्याचे म्हंटले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल नार्वेकर यांची राज्याच्या इतिहासात नव्हे तर देशात सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सभागृहाच्या अध्यक्ष पदाची भूमिका एखाद्या न्यायमुर्ती सारखी आहे. न्याय दिल्यावर एकाला न्याय, तर दुसऱ्याला अन्याय वाटतो.

योगायोग म्हणजे राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असून त्यांचे सासरे निंबाळकर विधानपरिषदेचे सभापती आहेत. जावई आणि सासऱ्याचं एकमत होत नाही असं म्हणतात असं मिश्किलपणे फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी सभागृहात एकच हशा झाला.

राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. नार्वेकर यांच्या विजयी झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आता दिसणार आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात झाला. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी उमेदवारी आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी व्हिप जारी केले आहे. परंतु शिंदे गटाने शिवसेनाचा व्हिप झुगारला. यामुळे राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. राहुल नार्वेकर यांना राज ठाकरे यांच्या मनसेची साथ मिळाली.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker