Breaking Newsराजकारण

Maharashtra Assembly Speaker Election : अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; विधीमंडळाच्या कामकाजात होणार सहभागी

आज (11वाजता) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये भाजपाकडून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आज (11वाजता) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये भाजपाकडून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी (Rajan Salvi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच यादरम्यान शिवसेनेने प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे.

२७ जून रोजी अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. पण आता अजित पवारांची (Ajit Pawar) कोरोना चाचणीचा अवहाल निगेटिव्ह आल्याने ते विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये सहभागी होणार आहेत.

या निवडणुकीमध्ये मतदानासाठी शिवसेनेने ‘व्हीप’ जारी केला आहे. तसेच प्रत्येक पक्षाचा व्हीप हा त्या पक्षाच्या आमदारांसाठी बंधनकारक असणार असून ‘व्हिप’चे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास म्हणजेच मतदानास गैरहजर राहिल्यास आणि ‘व्हिप’च्या विरोधात उल्लंघन केले तर त्या आमदारावर अपात्रतेची कारवाई केली जाईल. त्यामुळे त्याची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker