प्रबोधन

Kisanputra Andolan 2022: १९ मार्चच्या अन्नत्याग आंदोलनाचा मुख्य कार्यक्रम अंबाजोगाईत होणार

* अमर हबीब यांची विशेष उपस्थिती * विविध कार्यक्रमांचे आयोजन

१९ मार्च रोजी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा मुख्य कार्यक्रम या वर्षी किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई येथे होणार असल्यामुळे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अन्नत्याग आंदोलनाचे स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना सुदर्शन रापतवार यांनी पुढे असे म्हटले आहे की, आपणास माहीतच आहे की, १९ मार्च १९८६ रोजी, साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने पवनार आश्रमा जवळील दत्तपूर (जि.वर्धा) येथे जाऊन सामुहिक आत्महत्या केली होती. साहेबराव यांचे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण (ता. महागाव) चे बीज बिल थकल्यामुळे वीज कट करण्यात आली होती. अनेक प्रयत्न करूनही ते उभे पीक वाचवू शकले नाही म्हणून त्यांनी हा हृदयद्रावक मार्ग पत्करला, तसे तर त्यापुर्वीही असंख्य शेतकऱ्यांना आत्महत्या करणे भाग पडले होते. पण या आत्महत्येने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर शेतकरी दररोज अखंडपणे प्राणत्याग करीत आहेत. सरकारे बदलली, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बदलले. पण अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे खरे कारण काय आहे? लोक निमित्ताला कारण समजून भुई झोडपत राहिले. निमित्त काहीही असू शकते. कारण त्याच्या मागे असते. किसानपुत्र आंदोलनाने खऱ्या कारणांचा शोध घेतला आणि लक्षात आले की, सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण आदी कायद्यांचा शेतकऱ्यांना गळफास लागला आहे. हे कायदे अस्तित्वात असतील तोपर्यंत तुम्ही काहीही केले तरी शेतकऱ्यांचे दिवस बदलू शकणार नाहीत. सीलिंगमुळे शेतजमीनीचे विखंडन होत गेले. आज कितीही भाव दिला तरी अत्यल्प भूधारकाला आपले कुटुंब जगवणे कठीण आहे. आवश्यक वस्तू कायद्याने बाजारात सरकारी हस्तक्षेप करता आला. सरकारने कधीही भाव मिळू दिला नाही. अधिग्रहण ही टांगती तलवार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून सरकारने कायद्याने केलेले खून आहेत. नरभक्षी कायदे रद्द करणे हीकाळाची गरज आहे. आणि त्यासाठी हा उपवास / अन्नत्याग / उपोषण आहे.
नाव काहीही द्या. पण १९ मार्च रोजी उपवास / अन्नत्याग / उपोषण करून आपण आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत.
१९ मार्च रोजी होणाऱ्या या अन्नत्याग आंदोलनाचा समारोचा मुख्य
कार्यक्रम या वर्षी अंबाजोगाई येथे होणार असल्यामुळे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

◼️तीन दिवसीय पदयात्रा

या आंदोलना निमित्ताने बीड आणि लातुर जिल्ह्यातुन तीन दिवसांची पदयात्रा काढण्यात येणार आहे. सदरील पदयात्रा ही १७ मार्च रोजी पानगाव येथुन सुरु होणार असून तेथील स्थानिक संयोजन व भोजनाची जबाबदारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ढोणे गुरुजी यांनी घेतली आहे. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पर्यंत २० जणांनी आपल्या नावांची अधिकृत नोंदणी केली आहे. पानगाव येथून निघणारी ही पदयात्रा फावडेवाडी मार्गे घाटनांदुर येथे नागनाथ बडे यांच्या निवासस्थानी मुक्काम व भोजन करणार आहे. १८ मार्च रोजी ही पदयात्रा घाटनांदुर मार्गे पुस येथे येणार असून या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी मुक्काम व भोजनाची व्यवस्था केली आहे. १८ मार्च रोजी सकाळी ही पदयात्रा गिरवली येथून पुस येथे येणार आहे. येथे पुस येथील देवी मंदीरात प्रेस फोटोग्राफर अशोक कचरे व पत्रकार रमाकांत उडाणशीव यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी २:३०० वाजता ही पदयात्रा अंबाजोगाई शहरात दाखल होईल. या पदयात्रेचे संयोजन सुभाष कचवे, राजीव बसरगेकर, दत्ता वालेकर आणि अमर हबीब हे करणार आहेत.

◼️ रस्त्यावरील भिंती रंगवणार

शेतकरी आत्महत्याचे पार्श्वभूमीवर निघणारी ही तीन दिवसीय पदयात्रा जाणा-या मार्गावरील भिंती या निमित्ताने रंगवण्यात येणार असून आजुबाजुच्या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी या पदयात्रेत सहभागी व्हा असे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती या मोहीमेचे प्रमुख सुभाष कचवे यांनी दिली.
या पदयात्रेचा समारोपीय कार्यक्रम येथील नगर परिषदेच्या मुकु़दराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सुरु करण्यात येणार असून सर्वप्रथम जिल्ह्याबाहेरील किसान पुत्र या आंदोलनाशी माहिती देतील.
यायंकाळी पाच वाजता मुख्य समारोपीय कार्यक्रमात किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब आणि इतर दोन वक्त्यांची भाषणे होतील आणि समारोपीय कार्यक्रमानंतर आयोजित भोजनाचे या आंदोलनाचा समारोप करण्यात येईल अशी माहिती संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली असून यासर्व कार्यक्रमात बीड आणि लातुर जिल्ह्यातील किसान पुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब, सुभाष कचवे, वैजनाथ शेंगुळे, राजाभाऊ कुलकर्णी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गावरसकर, बालासाहेब केंद्रे, अनिरुद्ध चौसाळकर, दत्ता वालेकर व इतरांनी केले आहे.

◼️पदयात्रेचे होणार स्वागत

अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या या तीन दिवसीय पदयात्रेचे जोरदार स्वागत किसापुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब व शहरातील विविध राजकीय पक्षातील व सामाजिक संस्थांतील मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार असून शहरात महत्वाच्या चौकात बॅनर लावून या पदयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, रोटरी क्लबचे सदस्य, विविध पत्रकार संघाचे सदस्य, वकील संघाचे सदस्य यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker