शासनाकडे वारंवार मागणी करूनही स्मशानभूमी साठी जागा मिळत नाही, किंबहुना स्मशानभूमी साठी जागा मिळू नये यासाठी शासकीय यंत्रणा अडथळे आणत आहेत यामुळे शासनाला ५ जुलै रोजी यापुढे समाजबांधव मयत झाल्यास त्याचा अंत्यविधी शासकीय कार्यालया समोर करण्यात येईल असा इशारा देण्यात आल्यानंतर ही जागा उपलब्ध न झाल्याने आज नगर परिषदेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक गणपत वाघमारे यांच्या प्रेतासह आज लिंगायत समाज बांधवांच्या वतीने नगर परिषदेच्या कार्यालया समोर ठिय्या मांडला आहे.
लिंगायत स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न हा आता ज्वलंत प्रश्न बनला असून गेली अनेक दिवसांपासून लिंगायत समाज शासनाकडे स्मशानभूमी साठी जागा मिळावी शासकीय पातळीवर झगडत आहेत. या जुलै महिन्यातच समाज बांधवांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी यांना या गंभीर प्रश्नांची जाणीव करुन दिली होती.
लिंगायत स्मशानभूमीच्या जागेचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असून येथील उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने ९ मे २०२५ रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्र देऊन बाराखांबी लिंगायत स्मशानभूमीस लागून असलेली पुर्वे कडील जागा मोजून संयुक्त मोजणी अहवाल या कार्यालयास सादर करावा असे म्हटले होते. सदरील पत्र देऊन तीन महिने उलटले तरी नगर परिषद कार्यालयाने अजून ही आपला मोजणी अहवाल या कार्यालयास दिला नाही.
दरम्यान लिंगायत समाजाच्या वतीने जुलै महिन्यात तीन वेळेस नगर परिषदेच्या कार्यालयात जाऊन संबंधित मोजणीसाठी पाठपुरावा केला तरी अद्याप ही कसल्याही प्रकारची हालचाल केली नाही. म्हणून स्मशानभूमी साठी जागा देण्यास टाळाटाळ केली म्हणून गणपत वाघमारे यांच्या प्रेतासह लिंगायत समाज बांधवांनी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.
▪️ राजकिशोर मोदी यांनी केली यशस्वी
शिष्टाई !
या गंभीर प्रश्नांची दखल घेवून मागील वीस वर्षांपासून नगर अध्यक्ष म्हणून कार्यभार पहाताना आपले दिर्घकाळ सहकारी राहिलेल्या नगर परिषदेचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक गणपत वाघमारे यांच्या प्रेताची विटंबना होवू नये म्हणून राजकिशोर मोदी यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व लिंगायत समाज बांधवांमध्ये दुरध्वनी वरुन यशस्वी शिष्टाई घडवून आणली.
▪️ फीस भरुन लगेच
मोजणी करून घेवू
यावेळी दुरध्वनी वरुन लिंगायत समाज बांधवांशी बोलताना स्मशानभूमीच्या जागेसाठी भुमी अभिलेख कार्यालयाच्या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करणे सुरू असून येत्या दोन दिवसांत रितसर मोजणी पीस भरुन मोजणी करून घेवू असे आश्वासन दिल्यानंतर लिंगायत समाजाच्या वतीने गणपत वाघमारे यांच्या प्रेतासह सुरु केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
▪️ पारंपरिक लिंगायत
स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार
सदरील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर लिंगायत समाजाच्या बाराखांबी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव, आप्तेष्ट, मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली होती.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.