अंबाजोगाई येथील भुमी पुत्र इशान राहुल हाके पाटील याने नुकत्याच झालेल्या १२ वी सीबीएससी बोर्ड परीक्षेत ९५.६० टक्के तर NEET-UG परीक्षेत ९९.२० %टाइल गुण घेऊन लातुर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेज मधुन त्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे. सदरील यशाबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. राहुल हाके पाटील आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. रुपाली यांचा मुलगा असलेल्या ईशान हाके पाटील याचे इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत चे शिक्षण अंबाजोगाई येथील सर्निजी इंग्लिश स्कूल येथे झाले असून पहिल्या इयत्ते पासून ईशान याने आपल्या वर्गात टॉप फाइव्ह मध्ये येण्याचा मान मिळवला आहे.
१० इयत्तेत चांगले गुण मिळविल्यानंतर ईशान याने पुढील शिक्षणासाठी लातुर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. ११ वी वर्गातील पहिल्या परीक्षेपासूनच ईशान याने येथे ही आपले शैक्षणिक वर्चस्व कायम ठेवत वर्गात सतत टॉप फाइव्ह मध्ये येण्याचा विक्रम केला.
नुकत्याच झालेल्या १२ वी सीबीएससी बोर्ड परीक्षेत ९५.६० टक्के तर NEET-UG परीक्षेत ९९.२० %टाइल गुण मिळवत महाविद्यालयातुन तिसरा येण्याचा मान मिळवला. त्यांच्या या अलौकिक यशाबद्दल लातुर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेज च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यातील एका विशेष समारंभात लातुर पॅटर्न चे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ईशान हाके पाटील याचा सत्कार करण्यात येवून त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ईशान यांच्या उज्वल यशासाठी गेली दोन वर्षे त्याची आई डॉ. रुपाली, वडील डॉ. राहुल हाके पाटील आणि संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक वृंदांनी विशेष परीश्रम घेतले. ईशान हाके पाटील याने मिळवलेल्या या अतुलनीय यशाबद्दल अंबाजोगाई शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.