महाराष्ट्र

आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वे ८० विशेष गाड्या चालवणार

आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वे ८० विशेष रेल्वे गाड्या चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वे चे झोनल रेल्वे सल्लागार डॉ. आदित्य पतकराव यांनी दिली आहे .

या संदर्भात मध्य रेल्वे चे झोनल रेल्वे सल्लागार सदस्य (ZRUCC) डॉ. आदित्य पतकराव यांनी माहिती देतांना सांगितले की, या विशेष गाड्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना पंढरपूरला पोहोचण्यासाठी सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही डॉ . आदित्य पतकराव यांनी केले आहे.

मध्य रेल्वेने आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने भाविकांसाठी एकूण ८० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या १ जुलै २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी धावतील. या विशेष गाड्यांमध्ये १० शयनयान, ४ सामान्य डबे आणि २ एसएलआर गार्ड ब्रेक व्हॅन असतील, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.

▪️विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग:

१. नागपूर-मिरज विशेष गाड्या

(४ सेवा)

• नागपूर → मिरज (ट्रेन क्रमांक: 01205) वेळ: 08:50 (04.7.2025 ते 05.7.2025) आगमन: 11:55 (दुसऱ्या दिवशी)

२• मिरज → नागपूर (ट्रेन क्रमांक: 01206) वेळ: 12:55 (05.7.2025 ते 06.7.2025) आगमन: 12:25 (दुसऱ्या दिवशी) थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चंदूर, बडनेरा, वाशिम, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, चाळीसगांव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज.

३. लातूर-पंढरपूर विशेष गाड्या

(१० सेवा)

४. लातूर → पंढरपूर

(ट्रेन क्रमांक: 01101) वेळ: 07:30 (02.7.2025, 04.7.2025, 07.7.2025, 08.7.2025, 09.7.2025) आगमन: 12:50

५ • पंढरपूर → लातूर

(ट्रेन क्रमांक: 01102) वेळ: 13:50 (02.7.2025, 04.7.2025, 07.7.2025, 08.7.2025, 09.7.2025)आगमन: 19:20थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरुड (डी) , ढोकी, कळंब रोड (डी) , येडशी, उस्मानाबाद, पांगरी , बार्शी टाउन, शेंद्री, कुर्डवाडी, माडलिंब.

६. मिरज-कालबुर्गी विशेष गाड्या (२० सेवा)

• मिरज → कालबुर्गी (ट्रेन क्रमांक: 01107) वेळ: 05:00 (01.7.2025 ते 10.7.2025) आगमन: 13:30

७ • कालबुर्गी → मिरज

(ट्रेन क्रमांक: 01108) वेळ: 15:30 (01.7.2025 ते 10.7.2025) आगमन: 23:50 थांबे: अराग, बेलंकी, सलगरे, कवठे महाकाल, पंढरपूर, सांगोला, जालके, वासुद, मसोबा डोंगरगांव, जत रोड, धालगांव, विजापूर.

८. भुसावळ-पंढरपूर विशेष गाड्या (२ सेवा)

• भुसावळ → पंढरपूर

(ट्रेन क्रमांक: 01159) वेळ: 13:30 (05.7.2025) आगमन: 03:30 (दुसऱ्या दिवशी)

• पंढरपूर → भुसावळ

(ट्रेन क्रमांक: 01160) वेळ: 22:30 (06.7.2025) आगमन: 13:00 (दुसऱ्या दिवशी) थांबे: जलगांव, पाचोरा, चाळीसगांव, नांदगांव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डवाडी.

९. पुणे-मिरज विशेष गाड्या

(१६ सेवा)

• पुणे → मिरज

(ट्रेन क्रमांक: 01207) वेळ: 08:40 (03.7.2025 ते 10.7.2025)

आगमन: 18:45

• मिरज → पुणे (ट्रेन क्रमांक: 01208) वेळ: 19:30 (03.7.2025 ते 10.7.2025) आगमन: 04:30 (दुसऱ्या दिवशी) थांबे: हडपसर, उरळी, दौंड, जेजुरी, कुर्डवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, वासुद, जालके, मसोबा डोंगरगांव, जत रोड, धालगांव, विजापूर, कवठे महाकाल, सलगरे, बेलंकी, अराग.

१०. कोल्हापूर-कुर्डवाडी विशेष गाड्या (२० सेवा)

• कोल्हापूर → कुर्डवाडी

(ट्रेन क्रमांक: 01209)

वेळ: 06:10 (01.7.2025 ते 10.7.2025) आगमन: 13:30

• कुर्डवाडी → कोल्हापूर (ट्रेन क्रमांक: 01210) वेळ: 16:30 (01.7.2025 ते 10.7.2025) आगमन: 22:30

थांबे: हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अराग, बेलंकी, सलगरे, कवठे महाकाल, पंढरपूर, सांगोला, जालके, वासुद, मसोबा डोंगरगांव, जत रोड, धालगांव, विजापूर.

११. स्वामीगांव-पंढरपूर विशेष गाड्या (४ सेवा)

• स्वामीगांव → पंढरपूर

(ट्रेन क्रमांक: 01121)

वेळ: 11:30 (03.7.2025 ते 06.7.2025)

आगमन: 03:30

• पंढरपूर → स्वामीगांव

(ट्रेन क्रमांक: 01122)

वेळ: 05:00 (04.7.2025 ते 07.7.2025)

आगमन: 19:30

थांबे: जलंब, नांदुरा, मलकापूर, बोडवड, भुसावळ, जलगांव, पाचोरा, चाळीसगांव, नांदगांव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डवाडी.

१२. नवीन अमरावती-पंढरपूर विशेष गाड्या (४ सेवा)

• नवीन अमरावती → पंढरपूर

(ट्रेन क्रमांक: 01119)

वेळ: 14:40 (02.7.2025 ते 05.7.2025)

आगमन: 09:10 (दुसऱ्या दिवशी)

• पंढरपूर → नवीन अमरावती

(ट्रेन क्रमांक: 01120)

वेळ: 19:30 (03.7.2025 ते 06.7.2025)

आगमन: 12:50 (दुसऱ्या दिवशी)

थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोडवड, भुसावळ, जलगांव, पाचोरा, चाळीसगांव, नांदगांव, मनमाड, कोपरगांव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डवाडी.

या सर्व रेल्वे सेवेचा लाभ आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर ला येणाऱ्या आणि परत जाणा-या भाविकांनी घ्या असे आवाहन मध्य रेल्वेचे झोनल रेल्वे सल्लागार सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker