महाराष्ट्र
हरणाबाई जाधव पुरस्काराने बिपिन देशपांडे सन्मानित

झेप परिवाराच्या वतीने झेप साहित्य संमेलन घेतले जाते. यंदाचे 14 वे संमेलन वाळूज महानगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूलमध्ये रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले असून, यामध्ये “लोकसत्ता”चे वरिष्ठ पत्रकार बिपीन देशपांडे यांना कवयित्री हरणाबाई जाधव स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
