50 गुंठ्यांत घेतले 120 टन ऊसाचे उत्पादन; कसे केले व्यवस्थापन?
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/image_editor_output_image1141295776-1670428222125.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/image_editor_output_image1141295776-1670428222125.jpg)
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. म्हणूनच देशातील नागरिक जास्तीत जास्त शेती व्यवसायावर (Agribusiness) अवलंबून आहेत. यामुळेच शेतकरी आपल्या पिकाची काळजी आपल्या मुलांप्रमाणे घेतात. तेव्हा कुठे त्यांचं शेती पीक (Department of Agriculture) बहरत. शेती हा असा व्यवसाय (Business) आहे जो मन लावून केला तर लखपती बनवतो. मग शेतीचा (Agri News) एक तुकडा जरी असला तरीही, त्यातून शेतकरी बक्कळ नफा कमावू शकतात. आता अशाच एका कष्टाळू शेतकऱ्याने केवळ 50 गुंठ्यांत तब्बल 120 टन ऊसाचे उत्पादन (Sugarcane Production) घेतले आहे.
▪️50 गुंठ्यांत 120 टन ऊस उत्पादन
ऊस उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. म्हणजेच महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन घेतले जाते. आता महळूंगे पडवळ (ता. आंबेगाव) या गावातील शेतकरी (Agricultural Information) राजेंद्र नरहरी आवटे यांनी थेट 50 गुंठ्यांत 120 टन ऊसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये एकात्मिक खत व्यवस्थापनाच्या (Integrated Fertilizer Management) जोरावर फक्त 50 गुंठे जमिनीत 86032 जातीच्या ऊसाचे तब्बल 120 मेट्रिक टन उत्पादन घेतले आहे.
▪️कसे केले व्यवस्थापन?
या शेतकऱ्याने ऊस लागवडीनंतर 15 दिवसांची लायकोसिन, युरिया, उकिली ही औषधे प्रमाणित घेऊन आळवणी केली होती. ज्यानंतर त्यांनी 20 दिवसांनी पुन्हा बडसुटर, युरिया यांची आळवणी केली होती. या आळवणीमुळे एका खुटातून 8 ते 12 फुटवे निघाले होते.
तसेच शेतकऱ्याने जैविक खतांचा वापर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत दिल्या जाणार्या अॅझोफॉसफो, अॅसिटोबॅकर यांसारख्या जैविक खतांचा वापर केला होत. त्याचबरोबर व्ही. एस. आय. उत्पादित मल्टिमायक्रो व मल्टिमॅक्रो फवारणीमुळे ऊसाच्या उत्पादनात भन्नाट वाढ झाली. ज्यामुळे शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.