17 एप्रिल रोजी अंबाजोगाईत मानसिक आजार व ताणतणाव निवारण शिबीर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_133954-1024x644.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_133954-1024x644.jpg)
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या लोखंडी सावरगाव येथील वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात १७ एप्रिल रोजी मानसिक आजार व ताण तणाव निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे राहणार आहेत. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
आ. नमिता मुंदडा व डॉ. सुरेश साबळे यांची प्रमुख उपस्थिती
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_134108-1024x775.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_134108-1024x775.jpg)
अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगाव परीसरात सुरु करण्यात आलेल्या वृध्दत्व निवारण व मानसिक आजार केंद्रात १७ एप्रिल रोजी दिवसभर मानसिक आरोग्य तपासणी व ताण तणाव निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे अनौपचारिक उद्घाटन सकाळी ९ वाजता या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे हे उपस्थित राहणार आहेत.
केइएम चे डॉ. प्रमोद तोटेवाड व इतर टीम करणार रुग्णांची तपासणी
या शिबीरास मुंबई येथील केइएम हॉस्पिटल चे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रमोद तोटेवाड, वृध्दत्व आजार व मानसिक आजार केंद्राचे अधिक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. अरुणा केंद्रे आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील मानसिक रोग तज्ञ डॉ. शिवराज पेस्टे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब लोमटे यांनी केले आहे.
मतीमंदत्व, निद्रानाश, विसराळुपणा, भिती, संशय येणे, आत्महत्येचे विचार यावर उपचार
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_133938-1024x657.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_133938-1024x657.jpg)
या मानसिक आजार व ताण तणाव निवारण शिबीरात व्यसनमुक्ती, विसराळुपणा, वर्तनातील बदल, परत परत विचार येणे, वेडेपणा, संशय येणे, चिंता, भिती, घबराहटपणा, आत्महत्येचे विचार, डोकेदुखी, लैंगिक समस्या, भास होणे, उदासिपणा, उन्माद, मतीमंदत्व, सिझोफ्रेनिया, समुपदेशन ( शिक्षण, करीयर, विवाह, कलह),करणी, अंगात येणे, भुतबाधा, निद्रानाश, अती नैराश्य,बालवयातील मानसिक समस्या व इतर आजारांवर उपचार करण्यात येणार आहे.
मोफत उपचार व समुपदेशन!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_133920-233x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_133920-233x300.jpg)
या मानसिक आरोग्य व उपचार शिबीरात सर्व मानसिक आजारांचे रोग निदान, उपचार आणि समुपदेशन मोफत करण्यात येणार असून या शिबीरास येताना रुग्णांनी यापुर्वी उपचार विषयक सर्व रिपोर्ट सोबत घेऊन यावेत असे आवाहन संयोजकांनी केले आहे.