16 ऑगस्ट पासून सुरु होणार मोठा पाऊस; हवामान तज्ञांचा अंदाज!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230810_215903-1024x613.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230810_215903-1024x613.jpg)
25 जुलै पासून दडी मारलेल्या पावसास 16 ऑगस्ट पासून सुरूवात होणार असून साधारणतः महिना अखेर पर्यंत हा पाऊस राहणार आहे, या कालावधीत मोठ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचे भाकित हवामान तज्ञांनी केले आहे.
हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, त्यामुळे पावसा बाबतची शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मागील जुलै महिन्याच्या 25 तारखेपासून पावसात खंड पडला होता. त्यामुळे साधारणतः हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 12 तारखेपर्यंत पावसाचा खंड असणार आहे असे सांगण्यात आलेले होते. हवामान तज्ञ पंजाब डख यांनी नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230810_215837-300x254.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230810_215837-300x254.jpg)
16 ऑगस्ट पासून या पावसास सुरुवात होणार असून साधारणतः 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर असणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती व त्यादरम्यान अनेक भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला होता. या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी नदी नाले सुद्धा भरून वाहीले होते , मात्र परंतु अनेक भागांमधील धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली नव्हती. या संदर्भात हवामान अभ्यासक पंजाब डख त्यांनी राज्यात 16 ते 30 ऑगस्ट या तारखे दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता वर्तलेली आहे. या तारखे दरम्यान होणा-या मोठ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230810_215812-300x199.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230810_215812-300x199.jpg)
जोरदार पावसाची सुरुवात 16 तारखेपासून होणार आहे. तसेच 16 ते 30 या तारखे दरम्यान सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा या तारखे दरम्यान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडणार नाही असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवलेला आहे.