चारीत्र्याचा संशय घेवून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १५ वर्षे सक्त मंजूरी ची शिक्षा
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल
![Ambajogai court](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/ambajogai-court.png)
![Ambajogai court](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/07/ambajogai-court.png)
अंबाजोगाई / चारीत्र्याचा संशय घेवून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांनी १५ वर्षे सक्त मंजूरी व १० हजार रुपये दंडाची ची शिक्षा ठोठावली.
अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांडा येथील रहिवासी संतोष उमाजी जाधव याने आपली पत्नी अहिल्याबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ३ ऑगस्ट २०१८ रोजी झोपत असतांनाच डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला होता.
सदरील प्रकरणी अंबाजोगाई येथील अतिरिक्त दुसरे सत्र न्यायाधीश माननीय श्रीमती एस. जे. घरत मॅडम यांच्या पुढे चालू असलेल्या सत्र प्रकरण क्र. २५/२०१८, सरकार वि. संतोष उमाजी जाधव या प्रकरणामध्ये आरोपी संतोष उमाजी जाधव, रा. काळवटी तांडा, ता. अंबाजोगाई, जि. बीड यास कलम ३०७. भा. द.वी अन्वये दोषी ठरवत पंधरा वर्षे सक्तमजुरी शिक्षा व दहा हजार रूपये दंड ठोठावण्यात आला.
सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी हनुमंत शामराव राठोड, रा. वानटाकळी तांडा यांची मुलगी अहिल्याबाई हिचे लग्न आरोपी संतोष उमाजी जाधव याच्यासोबत झाले होते. त्यानंतर त्याला दोन मुले होते. त्यानंतर आरोपी हा तिला नेहमी तिच्या चारीत्रावर संशय घेवून त्रास देत होता. घटनेच्या दहा दिवसापूर्वी पत्नीची मला गरज नाही आणि चारित्रावर संशय घेवून तिला माहेरी पाठविले होते. त्यानंतर घटनेच्या तीन दिवस अगोदर पत्नीला त्रास देणार नाही व मुलाच्या जेवणाची व्यवस्था होत नाही म्हणून तिला काळवटी तांडा येथे घरी बोलावून घेतले व दि. ०३ ऑगस्ट २०१८ रोजी पत्नी अहिल्याबाई घरी झोपेत असताना आरोपीने रात्री कु-हाडीने डोक्यात डाव्या कानाच्या वर वार करून खुन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती व तिला उपचारासाठी अंबाजोगाई व लातूर येथे पाठविण्यात आले होते. अशी आशयाची फिर्याद फिर्यादीने पो.ठा. अंबाजोगाई ग्रामीण येथे दिली.
त्याप्रमाणे पो.ठा.अंबाजोगाई ग्रामीण यांनी आरोपी विरुद्ध गु.रं.नं. ३०९ / २०१८, कलम ३०७ भा. द.वी प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक एच. एस. गंधम यांनी आरोपी विरूध्द दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल केले होते. विशेष बाब म्हणजे प्रस्तुत प्रकरणातील जख्मी अहिल्याबाई ही सदर कायमची हल्ल्यातून वाचली परंतु सदर डोक्यात झालेल्या गंभीर जखमे मुळे तिची वाचा ( बोलण्याची क्षमता) गेली.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले व त्यांची साक्ष ग्राहय धरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. दुसरे सत्र न्यायाधीश श्रीमती एस. जे. घरत मॅडम यांनी सदर आरोपीला पंधरा वर्षे सक्तमजुरी
शिक्षा व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरण हे आरोपीला तुरूंगात ठेवून चालविण्यात आले व सदर प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले व त्यांना अॅड. नितीन पुजदेकर यांनी सहकार्य केले. तसेच पोलीस पैरवी बाबुराव सोडगीर व पो. ना. शितल घुगे यांनी सहकार्य केले होते,