महाराष्ट्र

३२ वेळा शॉक देवून वाचवले अत्यवस्थ रुग्णांचे प्राण; डॉ.नवनाथ घुगे

-हदयविकारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अत्यवस्थ रुग्णाला तब्बल ३२ वेळा शॉक व इतर आवश्यक ते उपचार करून त्याचे प्राण वाचल्याचे माहिती येथील प्रख्यात -हदयरोग तज्ञ तथा डॉ. घुगे हार्ट केअर ऍन्ड क्रिटिकल केअर सेंटर चे संचालक डॉ. नवनाथ घुगे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. नवनाथ घुगे यांनी विस्ताराने सांगितले की, दुपारी साधारणतः 2.30 ची वेळ होती. अंदाजे ६० वर्षे वय असणारे एक गृहस्थ, छाती दुखत आहे म्हणून आय.सी.यु मध्ये दाखल झाले. तात्काळ ई. सी.जी केल्यानंतर, त्यांना गंभीर स्वरूपाचा हार्ट अटॅक असल्याचे आढळले. तत्काळ त्यांना सर्व प्राथमिक औषधोपचार चालू केले. दरम्यान त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आली होती. त्यांना थोडक्यात रुग्णाच्या अतिशय गंभीर परिस्थितीची माहिती दिली. त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेरगावी होती. त्यांच्याकडून त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांना पेशंट च्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. मुलगा समजदार असल्यामुळे त्याने आम्हाला सर्वतोपरी योग्य उपचार करण्याबद्दल विनंती केली. सर्व प्रथमोपचार व EMMERGENCY उपचार करत असतानाच, रुग्णाच्या पत्नीला रुग्णाबद्दलची सर्व माहिती विचारली असता असे सांगण्यात आले की, त्या रुग्णांस दोन दिवसापासून छातीत अधून मधून दुखत होते. परंतु त्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. ज्या दिवशी ते आमच्याकडे ऍडमिट झाले, त्या सकाळी त्यांच्या पत्नीने , रुग्णास , घुगे हॉस्पिटलला आपण जाऊ आणि घुगे डॉक्टरांना , आपण दाखवू अशी विनंती केली होती . परंतु त्या आजोबांनी ऐकले नाही. मला काही झालेलं नाही असे त्यांनी उलट उत्तर दिले. परंतु काही वेळाने त्यांना जास्त छातीत दुखू लागले. नंतर गावामधून रिक्षामध्ये बसून ते एका इतर रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी ई.सी.जी. करून काही विशेष काळजीचे नाही, असे सांगून प्रथम उपचार करून घरी पाठविले. त्यावेळी सुद्धा रुग्णाच्या छातीत थोडे दुखतच होते. रुगणाच्या पत्नीने बाबांना (रुग्णास) खूप विनवणी केली की, घुगे डॉक्टरांना आपण खूप वर्षापासून ओळखतो. आपण गावाकडे जाण्यापूर्वी कमीत कमी एकदा छातीची काढलेली पट्टी (ECG) तरी त्यांना दाखवू आणि डॉक्टरांनी जर बर आहे , असे म्हटले तर गावाकडे जाऊ. परंतु बाबा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. छातीत दुखत असताना ते तसेच स्वतः मोटारसायकल चालवत गावी निघून गेले. आणि तासभरा नंतर त्यांना अतिशय असह्य छातीत वेदना होऊ लागल्या. शरीर संपूर्ण घामाने ओले चिंब झाले होते . त्यांना चक्कर येऊ लागली हाती व बऱ्याच उलट्या झाल्या. त्यानंतर मात्र गावातून तात्काळ भाड्याने रिक्षा करून त्यांना आमच्याकडे रुग्णालयात आणले व ऍडमिट केले. आम्ही तात्काळ क्षणाचा ही विलंब न करता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपचार चालू केले. परंतु या सर्व परिस्थितीमुळे रुग्णाची तब्येत अत्यंत गंभीर झाली होती. खूप महत्त्वाचा वेळ निघून गेला होता. त्यांचा रक्तदाब (BP) खूप कमी झाला होता. कोणत्याही क्षणी त्यांच्या जीवावर बेतेल अशी अवस्था झाली होती. रुग्णास रुग्णालयामध्ये दाखल करताना त्यांच्या सोबत त्यांच्या फक्त पत्नी एकट्याच होत्या. म्हणून आम्ही तात्काळ रुग्णाच्या मुलाला फोन करून पेशंट च्या गंभीर परस्थितीची माहिती दिली. आणि आम्ही सर्व प्रकार चे उपचार चालू केले. हे सर्व EMMERGENCY उपचार चालू असताना अचानक रुग्णाच्या हृदयाची स्पंदने (ठोके) वाढले(Ventricular Fibrillation) व काही क्षणातच हृदय बंद झाले. परंतु सर्व EMMERGENCY यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे तात्काळ D.C Shock दिला व CPR दिले. आणि चमत्कार घडला, जवळपास बंद पडलेले हृदय पुनर्जीवित झाले. काही मिनिटानंतर रुग्णास एकदम बरे वाटू लागले. रक्तदाब वाढविण्यासाठीची औषधी, तसेच हृदयाच्या नसेमध्ये अडकलेली रक्ताची गुठळी विरघळण्याचे , असे सर्व प्रकारचे औषधी आम्ही त्या रुग्णास चालू केले . काही मिनिटांच्या थरारातून थोडे सावरल्यासारखे वाटले. आम्हाला सर्वांना समाधान वाटले की, वेळेवर D.C. Shock दिल्यामुळे रुग्णांचे प्राण वाचले होते . परंतु जवळपास २० मिनिटानंतर परत रुग्णास तसाच अटॅक आला. परत हृदयाचे ठोके वाढले (ventricular Fibrillation) व काही क्षणात हृदय बंद पडले. याही वेळी तात्काळ CPR चालू करून D.C. Shock दिला व काही क्षणामध्ये परत रुग्ण पूर्ववत होऊन हृदय सुरू झाले. याही वेळी रुग्ण काही मिनिटांनी एकदम सावध झाले व स्पष्ट बोलू लागले. त्यांच्या छातीतील दुखणे पण कमी झाले होते. घाम येणे पूर्णपणे थांबले होते. परत १० ते १५ मिनिटानंतर तशीच परिस्थिती उद्भवली. Ventricular Fibrillation मुळे हृदय बंद पडले. पुन्हा रुग्णास तात्काळ D.C.Shock दिला व काही क्षणातच हृदय पूर्ववत झाले. परंतु यावेळी रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. रक्तदाब कमी झाला होता. रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर आले नव्हते. यानंतर मात्र आम्हाला हळूहळू अशी जाणीव होऊ लागली की, सर्व काही योग्य उपचार करून ३ ते ४ वेळा बंद पडलेले हृदय , D.C. Shock देऊन पूर्ववत झाले , तरीही रुग्ण वाचेल अशी शक्यता वाटत नव्हती. परंतु आम्ही आमचे सर्व प्रयत्न चालू ठेवले. परत एकदा तसाच प्रसंग, परत हृदय बंद पडले, परत D.C. Shock आणि काही क्षणामध्ये हृदय पूर्ववत चालु झाले. यावेळी मात्र रुग्णाचा श्वास व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना Ventilator (कृत्रिम श्वास यंत्रणा) जोडण्यात आले . यावेळी हृदय जरी पूर्ववत झाले असले तरी तब्येत आणखीनच बिघडली होती. रक्तदाब (BP) परत कमी झाला होता. परत साधारणतः ३० मिनिटांनी तोच प्रसंग , हृदय बंद पडले. तात्काळ D.C.Shock दिला व हृदय पुन्हा सुरू झाले. असा हा थरार जवळपास ३ ते 4 तास चालला . तब्बल ३२ वेळा हृदय बंद पडले. तब्बल ३२ वेळा D.C Shock देऊन हृदय पुनर्जीवित झाले. परंतु, आता मात्र रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता. श्वास पूर्णपणे Ventiletor द्वारे चालु होता. BP खूप कमी झालेला होता. या सर्व परिस्थितीमधून रुग्ण वाचेल अशी शक्यता अगदी कमी वाटत होती. ३२ वेळा बंद पडलेले हृदय पूर्ववत होणे. त्या दरम्यान मेंदूस रक्तपुरवठा कमी होऊन रुग्ण जरी जगला तरी मेंदूची कार्यक्षमता कायमची कमी होण्याची शक्यता असते. त्याला आपण पेशंट Brain Dead झाला असे म्हणतो. अशी आम्हाला भीती वाटत होती. तरीही यतकिंचित ही न डगमगता सर्व प्रकारे उपचार चालु ठेवले. तब्बल २४ तासानंतर रुग्णाच्या हाता पायांची थोडी थोडी हालचाल होऊ लागली. रक्तदाब हळू हळू पूर्ववत होऊ लागला . साधारणतः ३ दिवसानंतर सर्व खात्री करून रुग्णाचे Ventilator काढले. रुग्ण पूर्णपणे व्यवस्थित श्वास घेत होता. रक्तदाब वाढविण्याच्या औषधांचे चे प्रमाण हळूहळू कमी करण्यात आले. साधारणतः ५ दिवसानंतर सर्व परस्थिती अटोक्यात आल्यानंतर त्या रुग्णांस ANGIOGRAPHY साठी लातूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.संजय शिवपुजे सर यांच्या शिवपुजे हार्ट केअर रुग्णालयात या रुग्णास हलविले . तिथे डॉ. शिवपुजे सर यांनी हृदयाच्या दोन नसांची यशस्वी Angioplasty केली. जवळपास पुन्हा ५ दिवसानंतर रुगणास सुट्टी देऊन सुखरूप घरी पाठवले. आता ते पेशंट असमच्याकडे नियमितपणे Follow up साठी येतात. आणि त्यांची तब्बेत ठणठणीत आहे . खरोखरच या सर्व प्रकाराला नियतीचा खेळ म्हणायचा की, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, तात्काळ योग्य उपचार, मिळाल्यामुळे जवळपास ३२ वेळा मृत झालेल्या रुग्णास मिळालेले जीवदान म्हणायचे. दोन दिवसापासून छातीत दुखत होते. अक्षम्म्य दुर्लक्ष केले गेले. वारंवार पत्नीने सांगून सुद्धा त्या बाबांनी ऐकले नाही. छाती दुखत असताना घरी गेले. परत अतिशय गंभीर होऊन रुग्णालयात दाखल झाले. आणि 32 वेळा हृदय बंद पडून 32 वेळा D.C.Shock देऊन, पूर्ववत होऊन , हृदयाची दोन नसांची Angioplasty होऊन, रुग्ण सुखरूप घरी गेला. खरोखरच हा नियतीचा खेळच म्हणायचा........ सर्वाना नम्र विनंती , आपली काळजी घ्या . नियमित पने कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम करा. व्यसन करू नका . रक्तदाब व मधुमेह असेल तर नियमित तपासून त्यास नियंत्रणात ठेवा . रक्तातील कोलेस्टेरॉल व वजन नियंत्रणात ठेवा . छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका . तात्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉ.एन.बी. घुगे

MBBS, MD, MEDICINE

हृदयरोग तज्ञ व मधुमेह तज्ञ

MOB:- 9850784001

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker