Uncategorized

२३० खाटांच्या रुग्णालय इमारतीचे विस्तारीकरण; १४ कोटी ९९लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी


येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या २३० खाटांच्या सर्जरी विभागाच्या अंतररुग्ण विभागास अपुरी पडत असलेली जागा लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने या इमारतीवरील तिसऱ्या मजल्याच्या बांधकामास मंजूरी दिली असून या कामासाठी १४ कोटी ९९ लाख ९९ हजार ७७३ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली आहे.


या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व द्रव्ये विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक एससीएन-२०२३/प्रक्र.१४७/प्रशा-१, दि. २५ एप्रिल २०२३ अन्वये सदरील माहिती देण्यात आली आहे.


सदरील आदेशात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने या रुग्णालय विभागातील सर्जरी विभागातील रुग्णांच्या शुश्रुषेसाठी बांधण्यात आलेली २३० खाटांची इमारत अत्यंत अपुरी पडत असल्याने या इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी या इमारतीवर तिसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्याचे निश्चित केले असून या साठी १४ कोटी ९९ लाख ९९ हजार ७७३ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली आहे असे म्हटले आहे. या शासन निर्णयावर महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी सुधीर ज्या शेट्टी यांची स्वाक्षरी आहे.

आ. नमिता मुंदडा यांचा पाठपुरावा

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्जरी विभागातील २३० खाटांची इमारत अत्यंत अपुरी पडत असल्याने या इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. सदरील विस्तारीकरणामुळे आता या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पुन्हा तीन विभागाचे शस्त्रक्रिया गृह आणि आंतररुग्ण कक्ष होणार आहेत.त्यामुळे या विभागात उपचारासाठी येणा-या रुग्णांची अडचण कमी होणार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker