१९ मार्च; अन्नत्याग आंदोलनास राज्यभरातुन उत्स्फुर्त प्रतिसाद


शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा पाहून किसानपुत्रात तीव्र असंतोष निर्माण होत असून शेतकरी आत्महत्यांसाठी जाचक ठरणारे तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी आणि देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकरी आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी घ्या अन्नत्याग आंदोलनास राज्यभरातुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती किसान पुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी दिली.
19 मार्च ला होणार राज्यभर आंदोलन


येत्या 19 मार्च रोजी महाराष्ट्रभर अन्नत्याग उपवास केला जाणार आहे, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली. सत्ताधारी क्रूरपणे, विरोधीपक्ष बेजबाबदारपणे व मीडिया गाफीलपणे शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा करीत आहेत. याबद्दल किसानपुत्रांमध्ये रोष आहे, असे त्यांनी सांगितले.


21 फेब्रुवारी झालेल्या आढावा बैठकी नंतर अमर हबीब म्हणाले की, गडचिरोली पासून कोकणा पर्यंतचे प्रतिनिधीनी ते काय तयारी करीत आहेत या बाबत माहिती दिली. पुण्यात किसानपुत्र बालगंधर्व जवळ उपोषणाला बसतील त्या नंतर संध्याकाळी एसेम फौंडेशन येथे ‘कोरडी शेती ओले डोळे’ या पुस्तकावर आंतरभारतीच्या वतीने परिसंवाद होईल असे मयूर बागुल यांनी सांगितले. नितीन राठोड, विश्वास सूर्यवंशी, आदी सहकार्य करणार आहेत. आंबाजोगाईत पत्रकार उपोषणाला बसणार आहेत असे सांगून अनिकेत डिघोळकर म्हणाले की, सुदर्शन रापतवार यांच्या मार्गदर्शना खाली संध्याकाळी वसंत मुंडे यांचे व्याख्यान असयोजित केले आहे. शैलजा बरुरे यांनी स्वाराती महाविद्यालयातील विद्यार्थी मिरवणुकीने व्याख्यान स्थळी येतील असे सांगितले.


शहरातील विविध संघटना सहकार्य करीत आहेत. परतुर (जालना) च्या नवनाथ तनपुरे यांनी गावोगाव भोगा लावून 19 ला उपवास करण्याचे आवाहन करीत आहोत असे सांगितले तर ऐश्वर्या तनपुरे शेतकरी आत्महत्यांवर स्ट्रीट प्ले करणार आहे. अकोट (अकोला) येथे यंदा मोठ्या प्रमाणात उपवासाची तयारी करीत आहोत असे मुकेश टापरे यांनी सांगितले. देगलूरचे नरसिंग देशमुख, नांदेडचे प्रा डॉ विकास सुकाळे, डॉ. हरीश नातू पदयात्रेत सहभागी होतील. औरंगाबादचे भूषण पाटील यांनी 4 तारखेला बैठक बोलावली असल्याचे सांगितले. संदीप धावडे यांनी वर्ध्याच्या उपोषणाच्या तयारीची माहिती दिली. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे विष्णुपंत भुतेकर (वाशीम), रामकिसन रुद्राक्ष, नीलकंठ डांगे (जवळा बाजार), दिलीप माणगावे (सांगली), अनंत देशपांडे (लातूर) यांनीही मार्गदर्शन केले.
12 मार्च ला निघणार पदयात्रा
डॉ राजीव बसर्गेकर यांनी किनगाव (जळगाव) ते धुळे या मार्गावर निघणार्या पदयात्रे बद्दल माहिती दिली. हृतगंधा पाटील व संदीप धावडे यांचे वडील पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले. ही पदयात्रा 12 मार्चला निघणार आहे. सुभाष कच्छवे (परभणी) या पदयात्रेची तयारी करीत आहेत.