महाराष्ट्र
१० वी व १२ वी बोर्ड परीक्षा हॉलतिकीटावर जातीचा उल्लेख; पालकांकडून संताप !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून यावर्षी २१ फेब्रुवारी पासून सुरु होणा-या १० वी व १२ वी परीक्षांपुर्वी देण्यात येणाऱ्या हॉलतिकीटावर जातीचा उल्लेख टाकण्याच्या निर्णयावर पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पालकांकडून संताप व्यक्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून यावर्षी फेब्रुवारी महिन्यात १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या परीक्षांपुर्वी मंडळाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात येणाऱ्या हॉलतिकीटावर विद्यार्थीच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात येणार आहे. मंडळाच्या या निर्णयावर पालक वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत असून हॉलतिकीटावर जातीचा उल्लेख कशासाठी? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
भेदभाव केला जावू शकतो;पालकांची शंका
हॉलतिकीटावर जातीचा उल्लेख केल्यामुळे जात पाहुन परीक्षेत भेदभाव केला जावू शकतो अशी शंका उपस्थित करण्यात आली असून १० वी व १२ वी परीक्षेसाठी आरक्षणाची कसलीही तरतूद नसतांना हॉलतिकीटावर जातीचा उल्लेख करणे हे अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.
जातीय भेदभाव वाढण्याची शक्यता?
अशा उल्लेखामुळे लहान वयामध्येच विद्यार्थ्यांमध्ये जातीय भेद भावाची भावना वाढण्याची शक्यता जास्त असून यामुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांना गार्डींग करणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटावरील जात प्रवर्ग पाहून त्यास वेगवेगळी ट्रिटमेंट देवू शकतात अशी शंका ही पालकवर्गाकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

▪️मंडळाचा नाही तो उद्योग?
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी डॉक्टर सेल चे संयोजक डॉ. नरेंद्र काळे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला असून १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यात अपयशी ठरणा-या महामंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटावर जातीचा प्रवर्गाचा उल्लेख करण्याचे नाही ते उद्योग सुचत आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
