महाराष्ट्र

हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला; “माध्यम” तर्फे जाहीर निषेध!

महाराष्ट्रातील प्रथितयश लेखक, शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील गाढे अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांच्या वर शाळेतुन घरी परत येत असताना अज्ञात आरोपींनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी फिर्याद देवून आज तीन दिवस झाले तरी आरोपींविरुद्ध कारवाई केली नसल्याचे समजते.
या प्रकरणी हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी समाज माध्यमावर या प्राणघातक हल्ल्याची माहिती देणारी पोस्ट टाकल्यामुळे ही माहिती संपुर्ण महाराष्ट्रात वा-यासारखी पसरली आहे.
यासंदर्भात समाजमाध्यमांवर टाकलेल्या पोस्ट मध्ये हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. प्रतिमा कुलकर्णी यांनी म्हटले आहे की,”मी प्रतिमा कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी यांची पत्नी आहे.
माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.ते रस्त्यावर पडले.
त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे.
सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे.
आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे…
सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे.

प्रतिमा कुलकर्णी
9921288521

हेरंब कुलकर्णी यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा माध्यम न्यूज नेटवर्क तर्फे जाहीर निषेध.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker