हा माझा वैयक्तिक सत्कार नसून काळदाते कुटुंबाचा सत्कार !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image786872194-1689506114101-300x197.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image786872194-1689506114101-300x197.jpg)
सत्कारमुर्ती ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी व्यक्त केली कुटुंबाप्रति कृतज्ञता
वयाची नव्वदी पुर्ण केल्याबद्दल आयोजित केलेला हा सत्कार माझा वैयक्तिक नसून तो संपुर्ण काळदाते कुटुंबाचा सत्कार आहे अशी भावपुर्ण आणि सदगतीत कृतज्ञता सत्कारमुर्ती ज्ञानेश्वरराव काळदाते व्यक्त केली.
केज तालुक्यातील इस्थळ या गावचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वरराव काळदाते यांच्या वयाला नव्वदी पुर्ण झाल्याबद्दल काळदाते मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन आणि गौरव सोहळ्याती सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वरराव काळदाते बोलत होते. मानवलोक परिसरातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती बी. एच. मारल्लापल्ले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंदराव गोरे, वैद्यकीय शिक्षण सेवा संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, लातुर पॅटर्न चे जनक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अनिरुद्ध जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या वकील संघाचे अध्यक्ष ऍड. एन. एल. जाधव, सामाजिक कार्यकर्ते अण्णा खंदारे, माजी आमदार पृथ्वीराज साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0277-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0277-1024x682.jpg)
केज, अंबाजोगाई तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील शेजारी तालुक्यातील अनेक गावांमधील पंचक्रोशीतील सामाजिक, सहकार, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी वयाची नव्वदी पुर्ण केल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिष्टचिंतन आणि गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरराव काळदाते यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गौरव पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या अभिष्टचिंतन आणि गौरव सोहळ्यात बोलताना ज्ञानेश्वरराव चव्हाण यांनी अत्यंत भावुक आणि -हदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. ज्या मोठ्या प्रमाणात आ सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्या सत्काराला आपण खरेच पात्र आहोत का असा सारखा विचार आपण व्यासपीठावर बसलो असतांनाच करीत होतो. या सत्कार कार्यक्रमात माझे जे कोडकौतुक मान्यवरांनी केले ते कोडकौतुक माझ्या व्यक्तीमत्वापेक्षा खुप मोठे आहे असे सांगून आपला जन्म हा काळदाते कुटुंबात झाला हे मी माझे भाग्य समजतो असे ते म्हणाले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0279-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0279-1024x682.jpg)
आपले वडील रामराव काळदाते हे निजामकालीन राजवटीतील शिक्षीत गृहस्थ होते. घाटनांदुर येथील मंदिरात राहणा-या काशीयेथून आलेल्या एका साधुकडे त्यांचे हे लौकीक शिक्षण झाले. वडील हे शिक्षीत असून स्वतंत्र विचारसरणीचे होते, त्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना पुर्ण वैयक्तिक स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे आम्हा तीनही भावांना वेगवेगळ्या क्षेत्रात मनाप्रमाणे काम करता आले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२-५३ च्या सुमारास बनसारोळा येथे व्हॅलेंटाईन स्कुल ची सुरुवात झाली पुढे१९५६-५७ ला नारायणराव काळदाते यांनी बनेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना केली. मोठे बंधु नारायणराव काळदाते हे शिक्षण, मी शेती आणि माती तर लहान बापुसाहेब हे राजकारणाकडे वळले आणि आपापल्या क्षेत्रात चांगले काम करता आले. काळदाते कुटुंब हे अनेक वर्षे एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे राहीले असल्यामुळेच मला शेती आणि माती शी निगडीत चांगले काम करता आले. याकाळातील अनेक भावनिक आठवणींना ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी उजाळा दिला. आपले बंधु नारायणराव, डॉ. बापुसाहेब, डॉ . सुधा काळदाते आणि भाभीजी यांच्या सोबतच्या अनेक आठवणी सांगतांना ज्ञानेश्वरराव भावनिक झाले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0274-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0274-1024x682.jpg)
हा सत्कार चिंतन करण्याजोगा झाला आहे असे सांगून मी चंद्राप्रमाणे पर प्रकाशित आहे. काळदाते परिवारातील सर्व सदस्यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या प्रकाशात मी चमकलो गेलो आहे. हा सत्कार माझा नसून काळदाते कुटुंबाचा आहे अशी भावनिक कृतज्ञता ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी व्यक्त केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0276-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230716-WA0276-1024x682.jpg)
या कार्यक्रमात अंध्यक्षीय समारोप करताना मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती बी. एच. मारल्लापल्ले यांनी शेती माती आणि समाज प्रबोधनाचे ज्ञानेश्वरराव काळदाते यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे असे सांगत या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या आयुष्यात ज्ञानेश्वरराव काळदाते यांचा सहभाग महत्त्वाचा आहे असे सांगितले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ प्रवीण शिनगारे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, नंदकिशोर मुंदडा आणि अरविंदराव गोरे यांनी आपल्या भाषणात ज्ञानेश्वरराव काळदाते यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅचरल शुगर चे चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी तर आभार डॉ. नरेंद्र काळे यांनी मानले. या कार्यक्रमास केज आणि अंबाजोगाई तालुक्यासह संपुर्ण मराठवाड्यातुन ज्ञानेश्वरराव काळदाते यांना मानणारा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.