झेप परिवाराच्या वतीने झेप साहित्य संमेलन घेतले जाते. यंदाचे 14 वे संमेलन वाळूज महानगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूलमध्ये रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले असून, यामध्ये “लोकसत्ता”चे वरिष्ठ पत्रकार बिपीन देशपांडे यांना कवयित्री हरणाबाई जाधव स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी के. एस. अतकरे, संमेलनाध्यक्ष डॉ. बी. जी. गायकवाड, श्रीमती ए. बी. साळवे, स्वागताध्यक्ष डॉ. व्यंकट मैलापुरे, प्रा. शिवाजी वाठोरे, संयोजक डी. एन. जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकारिता, वाङमयीन क्षेत्रातील साहित्यिकांना गौरवण्यात आले. संमेलनात सकाळी ग्रंथ दिंडी, संमेलनाध्यक्षांचे भाषण, परिसंवाद, कविसंमेलन, आदी विविध कार्यक्रम पार पडले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.