स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील चार प्राध्यापकांच्या बदल्यांना स्थगिती
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/MAT-300x175.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/MAT-300x175.jpg)
लॉग स्टे मुळे झाल्या होत्या बदल्या!
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या
चार विभाग प्रमुखांच्या बदल्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाती कार्यरत असलेल्या
मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, फिजिऑलॉजी विभागप्रमुख डॉ. सौ. सुनिता बिराजदार, नाककानघसा विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, भुलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यु तरकसे आणि बायोकेमिस्ट्री विभागाचे डॉ. मुकुंद मोगरेकर या पाच प्राध्यापकांच्या बदली करण्यात आल्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाच्या वतीने मागील आठवड्यात जारी करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचनालयाच्या वतीने १० ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या या आदेशाचे पालन करीत डॉ. सौ. सुनिता हंडरगुळे (बिराजदार) या आज लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाल्या तर डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. अभिमन्यु तरकसे, डॉ. प्रशांत देशपांडे आणि डॉ. मुकुंद मोगरेकर यांनी या आदेशाविरोधात औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होऊन या चार प्राध्यापकांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. या प्रकरणात ऍड. जयंत चौधरी यांनी काम पाहिले.