स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात स्तन कर्करोग जनजागृती अभियानास सुरु
अक्षय मुंदडा यांच्या हस्ते झाला शुभारंभ
जागतिक महीला दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण व द्रव्ये औषधी विभागातर्फे राज्यभरात स्तन कर्करोग जनजागृती व ऊपचार अभियान राबवले जात असुन या अभियानाचे स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई येथे मा.अक्षयभैय्या मुंदडा ,डॉ.भास्कर खैरे , डॉ.शुभदा लोहीया यांच्या ऊपस्थितीत ऊदघाटन पार पडले.
याप्रसंगी बोलताना युवा नेते अक्षय मुंदडा यांनी स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधीक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग हा शरीराच्या इतर भागात झपाटयाने पसरतो, म्हणुन याचे निदान व उपचार लवकरात लवकर करणे गरजेचे आहे असे नमुद करुन स्तन कर्करोग जनजागृती व ऊपचार मोहिमेचा लाभ सर्वस्तरातील गरजु महीलांपर्यंत पोहचावा अशी अपेक्षा व्यक्त करुन आयोजकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .
गरजू महिलांपर्यंत अभियान पोहोचवा; अक्षय मुंदडा
या योजनेचे नोडल अधिकारी डॉ.नितीन चाटे यांनी प्रास्ताविक करताना सदरील अभियानामागील शासनाच्या निर्देशानुसार भुमिका स्पष्ट केली . 8 मार्च पासुन दर बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्वाराति रुग्णालय येथील ओपीडी क्र .२ मध्ये या अभियानासाठी विशेष बाह्यरुग्ण कक्ष सुरु केला गेला असुन तेथे स्तन कर्करोग , स्वयं स्तन तपासनी व संबंधीत माहीती, समुपदेशन व ऊपचार मोफत केले जातील अशी माहीती दिली .
१ लाख ७८ हजार ३६१ रुग्णांना स्तनाचा कर्करोग
भारतात महिलांमध्ये निदान झालेल्या एकुण ६,७८,३८३ कर्करोगाच्या रुग्णांपैकी १,७८,३६१ (२६.३%) रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे होते. तसेच २०२०, मध्ये भारतात, महिलांमध्ये कर्करोगाच्या ४, १३, ३८१ मृतांपैकी ९०, ४०८ (२१.९%) मृत्यु हे स्तनाच्या कर्करोगाचे होते. स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास
रुग्णास कमी हानी होते व जीवनमान सुधारते असे दिसुन येते .
त्या करिता खालील प्रमाणे काही त्रास असल्यास, तज्ञ डॉक्टरांकडुन योग्य ती तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
- स्तनाच्या कोणत्याही भागात गाठ तयार होणे, अथवा वेदना होणे
- स्तनावर सुज येणे, जळजळणे अथवा डाग पडणे
- स्तनग्रातुन रक्त येणे, लालसर होणे, वेदना होणे आत खेचले जाणे.
•स्तनांच्या आकारात बदल दिसणे.
हया सर्व लक्षणांवर, लक्ष देण्या करिता सर्व महिलांनी स्व:ताची स्तन तपासणी करणे गरजेचे आहे व योग्य वेळी डॉक्टरांकडुन स्तन तपासणी व गरज पडल्यास मॅमोग्राफी केल्यास स्तनाचा कर्करोग लवकरात लवकर निदान होण्यास मदत होते.
विविध रोग निदान व उपचार शिबीराचा लाभ गरजूंना मिळवून देणार; अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरै
याप्रसंगी बोलताना अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी शासनामार्फत मा.मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या स्थुलता निवारन, स्तन कर्करोग या मोहीमांसह आगामी काळात हाडाचा ठिसुळपणा, थायरॉईड आजार आदींबाबत देखील जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे नमुद करुन स्वाराति रुग्णालय या अभियानांचा लाभ अधिकाधीक नागरीकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुर्ण योगदान देणार असल्याची ग्वाही दिली.
सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.शुभदा लोहीया, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.देव मॅडम, अधिपरिचारीका भताने सिस्टर , लोकमत चे प्रतिनीधी अविनाश मुडेगावकर, मसने सर , दिव्य मराठी चे प्रतिनीधी रवि मठपती डॉ.अमित लोमटे, डॉ.नागेश अब्दागीरे आदी ऊपस्थित होते.
सुत्रसंचलन डॉ.चिन्मय इंगळे तर आभार प्रदर्शन डॉ.सतिश गिरेबोईनवाड यांनी केले.