स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयालाकेंद्र शासनाचा ६० कोटींचा निधी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-1455968486-1673625306463.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/image_editor_output_image-1455968486-1673625306463.jpg)
खा. डॉ. प्रितम मुंडे आणि आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
अंबाजोगाई आणि परिसरातील ग्रामीण रुग्णांची जीवनवाहिनी असलेल्या प्रख्यात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने तब्बल ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांसाठी तासिका, परिक्षा कक्ष आणि रूग्णालयासाठी यंत्रसामुग्रीची तरतूद करण्यात येणार आहे. बीडच्या खा. प्रीतमताई मुंडे आणि केज विधानसभ मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी ‘स्वाराती’च्या विकासासाठी निधी मिळविण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221216_134949.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221216_134949.jpg)
विद्यार्थी बैठक क्षमतेचा प्रश्न मार्गी लागणार!
स्वाराती रुग्णालयवर बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांचा ओढा आहे. अत्यल्प दरात तज्ञ डॉक्टरांमार्फत उच्च दर्जाचे उपचार मिळत असल्याने हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांची जीवनवाहिनी आहे. दरम्यान, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयासाठी मागील काही काळात एमबीबीएस जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या. विद्यार्थी संख्या वाढल्याने सद्य स्थितीतील तासिका कक्ष आणि परिक्षा कक्ष अपुरे पडत होते. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी खा. प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे तासिका आणि परिक्षा कक्षांच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या मागणीलायश आले असून केंद्र सरकारने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालात ३०० विद्यार्थी क्षमतेचा एक, २५० विद्यार्थी क्षमतेचे दोन लेक्चर हॉलसाठी आणि २५० विद्यार्थी क्षमतेच्या दोन परिक्षा कक्षांसाठी ३९.४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सोबतच, रुग्णालयातील यंत्रसामुग्रीसाठी २०.५६ कोटी रुपये असा एकूण ५९.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या काम्माना मंजुरी मिळाल्याने विद्यार्थी बैठक क्षमतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच, महाविद्यालयाला अत्याधुनिक यंत्रसामुग्री प्राप्त होणार असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी सोयीचे ठरणार आहे.
अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी मानले आभार!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230113_124837.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230113_124837.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढल्यानंतर त्यांच्या अभ्यासिकेचा प्रश्न निर्माण झाला होता. सदरील प्रश्न सोडविण्यासाठी या विभागाच्या खा. डॉ. सौ. प्रितम मुंडे आणि या विभागाच्या आ. सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने प्रयत्न करत महाविद्यालयाच्या अभ्यासिकेचा प्रश्न सोडविल्याबध्दल अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी आ. नमिता मुंदडा आणि खा.डॉ. प्रितम मुंडे यांचे आभार मानले आहेत.