स्वाराती वैद्दकीय महाविद्यालयात छाती व त्वचा विकार विभागास पदव्युत्तर अभ्यासक्रमास एनएमसी ची मान्यता


अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा (स्कीन) आणि छाती विकार (टीबी) विभागातील पदव्युत्तर शिक्षण राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नुकतीच मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील फक्त रेडिऑलॉजी विभाग वगळता इतर सर्व विभागातील पदव्युत्तर शिक्षणाची सोय या वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे. या दोन्ही विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्यामुळे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे व दोन्ही विभाग प्रमुखांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या पुर्वीपासून येथे असलेल्या सिव्हील हॉस्पिटलला विशेष महत्त्व होते ते टीबी रुग्णालयामुळे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपुर्वी येथील सिव्हिल हॉस्पिटल हे टीबी रुग्णालय म्हणून ओळखले जायचे. या रुग्णालयात मराठवाड्यातीलच नव्हे तर आंध्र आणि कर्नाटक या राज्यातील सिमावर्ती जिल्ह्यातील अनेक रुग्ण येथे टीबी रोगावरील उपचारासाठी येत असत. या रुग्णालयाची भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थिती ही हा योग लवकर बरा करण्यासाठी मदत करीत होता.


डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या पुढाकाराने या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्या नंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या विकासात हे टीबी रुग्णालयातील रुग्ण संख्या कमी झाली आणि इतर विभिगांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. आजच्या घडीला वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांपैकी फक्त रेडिऑलॉजी या विषयाव्यतिरिक्त इतर सर्व विषयांत पदव्युत्तर शिक्षण देणारे हे एकमेव महाविद्यालय झाले आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयात टीबी (chest pain) विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरु व्हावे यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी राष्ट्रीय विज्ञान आयोगाकडे हा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावातील अडथळे दुर सारीच आता या विभागातील पदव्युत्तर शिक्षणासाठी घ्या दोन जागांना राष्ट्रीय विज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे.


या वैद्यकीय महाविद्यालयात आता 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून Respiratory Medicine (श्वसन विकार) या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यता देण्यात आली आहे.
मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फक्त नांदेड येथील पद्मश्री शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय येथे या विषयातील पदव्युत्तर शिक्षण आहे, त्यानंतर आता अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास या विषयातील पदव्युत्तर शिक्षणास मान्यता मिळाली आहे हे विशेष आहे.
या सोबतच या वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ही राष्ट्रीय विज्ञान आयोगाने मान्यता दिली आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने २३ मार्च २०२३ रोजी घ्या आदेशात पुढे असे म्हटले आहे की, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाने 2 मार्च 2023 रोजी पाठवलेल्या अहवालात NMC ने घालून दिलेल्या सुचनांचे पालन केल्यावरुन या वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्वचा विभागात dermotology venorology & leprosy या विभागातील पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या 2 जागांना मान्यता देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.


छाती विकार व त्वचा विकार विभागातील या दोन्ही पदव्युत्तर अभ्यासक्रमास NMC च्या 26(1)(a)(b) 28(1)(2)of the NMC act 2019 नुसार शैक्षणिक वर्षे 2023-24 पासून मंजूरी देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. सदरील आदेशावर MARB चे अध्यक्षांची स्वाक्षरी आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा विकार व छाती विकार या दोन्ही विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रत्येकी दोन दोन जागा मिळाल्या असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, छाती विकार विभागाचे प्रमुख डॉ. विवेकानंद वाघमारे व त्वचा विकार विभागाचे प्रमुख डॉ. राठोड यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.