“स्वाराती” तील बहुचर्चित एमआरआय मशीन आज पासून होणार कार्यान्वित
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_101611-1024x751.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_101611-1024x751.jpg)
अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांची माहिती
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात २०२१ साली येवून पडलेली १७.५ कोटी रुपयांची बहुचर्चित टेस्ला ०.३ एमआरआय मशीन आज ८ जून पासून कार्यान्वित होणार असून या मशीनवर सूरुवातीचे काही दिवस फक्त पाच रुग्णांची तपासणी या मशीनवर करण्यात येणार असून पुढे नियमितपणे येणाऱ्या अत्यावश्यक रुग्णांच्या योग्य रोग निदान या मशीनवर करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112111-278x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112111-278x300.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा मिळावी यासाठी या महाविद्यालयाच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत असतात. याच प्रयत्नांच्या माध्यमातून या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या उपचाराची योग्य दिशा मिळावी व अचुक निदान व्हावे यासाठी एमआर आय मशीनची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_111952-905x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_111952-905x1024.jpg)
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक कल्याण मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी २०२१ साली कोवीड काळात या महाविद्यालयास १७.५ कोटी रुपयांची अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बनावटीची ०.३ टेस्ला एमआरआय मशीन मंजूर केली. २०२१ या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ही अत्याधुनिक बनावटीची मशीन वैद्यकीय महाविद्यालयात येवून दाखल झाली होती. मात्र या मशीनचा उभारणीसाठी स्वतंत्र इमारत, आवश्यक असणारा ४०० के व्ही वॅट चा उच्च दाबाचा वीज पुरवठा, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या सर्व प्रक्रिया कायदेशीररित्या पुर्ण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला. या सर्व प्रक्रिया पुर्ण करुन झाल्यानंतर चार दिवसांपासून ही मशीन योग्य पध्दतीने हाताळली जाते का नाही याचे प्रायोगिक प्रात्यक्षिक पुर्ण झाल्यानंतर आज ८ जून पासून ही बहुचर्चित टेस्ला ०.३ एम आर आय मशिन रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित करण्यात येत आहे.
सदरील मशीन हाताळण्यासाठी दोन टेक्निशियन, आणि या मशीनवर तपासणी करण्यात आल्याचा अहवाल देणा-या एका तज्ञ डॉक्टरांच्या शासनाच्या नियमानुसार नियुक्त्या करण्यात आल्या असून ही मशीन आज पासून सुरु करण्यात येणार आहे.
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख ते डॉ. भास्कर खैरे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112153-990x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112153-990x1024.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहणारे तात्कालिक अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या कार्यकाळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या वतीने एम आर आय मशीन मंजुरीबिबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठवण्यात आला होता. या सर्व प्रस्तावाचा पाठपुरावा करुन ही मशीन मंजूर करुन घेण्यासाठी सुरुवात करण्यात आली होती. तर ही मशीन उतरवून घेवून मशीन फिटींग, त्यांच्या एन्स्टॉलेशन, वीज जोडणी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आदींचे काम अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112236-298x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112236-298x300.jpg)
आ.धनंजय मुंडे, माजी आ.संजय दौंड यांचे प्रयत्न
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बनावटीची टेस्ला ०.३ ही एम आर आय मशीन मंजूर करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा सामाजिक कल्याण मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा आहे. यापुर्वी कमी सुविधा असलेली एम आर आय मशीन या वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने मंजूर करण्यात आली होती. मात्र सदरील मशीनच्या ऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बनावटीची टेस्ला ०.३ एम आर आय ही मशीन मंजूर करुन घेण्यात आ. धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा आहे. याकाळात विधान परिषदेचे सदस्य असलेल्या तत्कालीन आ. संजय दौंड यांनी या प्रकरणातील बारीकसारीक त्रुटी दूर करण्यात ही महत्त्वाची भुमिका होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112042-868x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_112042-868x1024.jpg)
खा. डॉ. प्रितम मुंडे, आ. नमिता मुंदडा यांनी केला सातत्याने केला पाठपुरावा
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात नोव्हेंबर २०२१ मध्ये टेस्ला ०.३ एम आर आय मशीन आल्यानंतर ती कार्यान्वित करण्यासाठी लागलेल्या दोन वर्षांच्या निलंबनाच्या कालावधीत सदरील मशीन लवकर सुरू करण्यासाठी वीज मंडळाच्या थकीत असलेल्या १ कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी भरुन ४००मेगा वॅट ची वीज जोडणी करून देण्यात आ. नमिता मुंदडा यांनी मोठी भुमिका बजावली होती. तर या कामास खा. डॉ. प्रितम मुंडे, आ. नमिता मुंदडा यांनी वारंवार भेटी देऊन सदरील युनिट लवकर सुरु होण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. या प्रकरणी खा. डॉ. प्रितम मुंडे आणि आ. नमिता मुंदडा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मशीन लवकर कार्यान्वित होण्यास मदत झाली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_111903-1024x977.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230608_111903-1024x977.jpg)
सामान्य जनतेत आनंदोत्सव!
▪️ सामान्य जनतेने आनंद स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात आज पासून सुरु होणा-या अत्याधुनिक बनावटीच्या टेस्ला ०.३ एम आर आय ही मशीन आज पासून सुरु होत असल्यामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
रेडिऑलॉजी विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याची गरज
वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडिऑलॉजी विभागात गेली अनेक वर्षांपासून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक नसल्यामुळे या विभागाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या विभागातील प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांच्या जागा रीक्त असल्यामुळे या विभागाचा अतिरिक्त पदभार यापुर्वी सर्जरी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नितीन चाटे यांच्या कडे गेली अनेक वर्षांपासून होता. आता सर्जरी विभाग प्रमुखाची जबाबदारी डॉ. नितीन चाटे यांच्या कडे आली असल्यामुळे आता या विभागाच्या प्रमुख पदांची जबाबदारी डॉ. अमित लोमटे यांच्या कडे आहे. या विभागांतर्गत येणाऱ्या एक्स रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि आता एम आर आय हे युनिट प्रभावी पुणे चालवण्यासाठी आवश्यक असणारा तज्ञ आणि प्रशिक्षीत शिक्षक वर्ग प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व इतर रिक्त जागा तातडीने भरण्याची गरज आता निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षांपासून रीक्त असलेल्या या जागा त्वरीत भरण्याची गरज आता निर्माण झाली आहे.