स्वारातीवै महाविद्यालय कर्मचारी निवासासाठी १५० कोटी चार निधी मंजूर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170459-1024x711.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170459-1024x711.jpg)
वर्ग ३ व वर्ग ४ घ्या कर्मचाऱ्यांना मिळणार ३५२ नवी निवासस्थाने!
येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील वर्ग -३, वर्ग-४ कर्मचाऱ्यांसाठी एकूण ३५२ नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी (दि.२५) तब्बल दिडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जीर्ण झालेल्या निवासस्थानांना भेट देऊन आ. मुंदडा यांनी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांना नवीन निवासस्थाने मिळाव्यात यासाठी शासनाकडे युद्धपातळीवर प्रयत्न केले होते. आ. मुंदडा यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याने जुन्या इमारतीमधून हालाखीत दिवस काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता लवकरच नवीकोरी, अद्यावत निवासस्थाने मिळणार आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170434-1024x961.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170434-1024x961.jpg)
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय येथील कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय म्हणून रुग्णालय परिसरात अंदाजे ५० वर्षापूर्वी निवासस्थाने उभारण्यात आले. कालौघात या इमारती जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. दरवाजे खिडक्या मोडकळीस आल्या आहेत, भिंतीवरती मोठमोठी झाडे उगवली, घरातील रंग उडालेल्या भिंती, तुटलेले नळ, बंद असलेले शौचालयाचे चेंबर, पावसाळ्यात गळके छत यामुळे कमर्चारी आणि त्यांचे कुटुंबीय त्रस्त झाले होते. अनेकांनी परवडत नसताना खाजगी घरात भाड्याने राहणे सुरु केले. याबाबत कर्मचाऱ्यांनी आ. नमिता मुंदडा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडल्यानंतर आ. मुंदडा यांनी निवासस्थानांना भेट दिली. स्वतः कर्मचाऱ्यांच्या घरात जाऊन दुरावस्थेची पाहणी केली होती .
५० वर्षापुर्वीची जुनी निवासस्थाने झाले कुचकामी
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170446-1000x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170446-1000x1024.jpg)
यावेळी आ. मुंदडा यांनी कर्मचाऱ्यांना नवीन निवासस्थाने देण्याचा शब्द दिला. त्यानंतर आ. मुंदडा यांनी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबत आग्रही मागणी केली. अखेर आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने स्वाराती रुग्णालयातील वर्ग -३ कर्मचाऱ्यांसाठी २५६ निवासस्थेन बांधण्यासाठी ११२ कोटी ३७ लाख रुपये तर वर्ग-४ कर्मचाऱ्यांसाठी ९६ निवासस्थाने बांधण्यासाठी ३७ कोटी १६ लाख असा तब्बल दिडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने लवकरच कर्मचाऱ्यांना अद्यावत नवीकोरी निवासस्थाने मिळणार आहेत. यानिमित्ताने कर्मचार्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170616-300x209.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230825_170616-300x209.jpg)
स्वाराती रुग्णालयातील अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देणार!
अहोरात्र रुग्णसेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधानी आहे. अंबाजोगाईचे वैभव आणि रुग्णांची जीवनवाहिनी असणाऱ्या स्वाराती रुग्णालयातील प्रत्येक अडचण सोडवून उच्च दर्जाची रुग्णसेवा मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. नमिता मुंदडा यांनी “माध्यम” शी बोलताना सांगितले.