स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_171219-1024x881.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230122_171219-1024x881.jpg)
आज स्वामी रामानंद तीर्थ यांची पुण्यतिथी…
त्यांच्या स्म्रतीस विनम्र अभिवादन..स्वामी रामानंद तीर्थ यांची
संक्षीप्त माहिती
—————————-
जन्म : ३ आँक्टोबर, सिंदगी या गावी
जि. विजापुर. (आं. प्र.)
मँट्रीक : टीळक महाराष्ट्र विद्दापीठाची
परीक्षा देवून जुलै १९२१.
इंटर : अंमळनेर, राष्ट्रीय महाविद्दालय
१९२३
वांग्मय विषारद : टीळक महाराष्ट्र विद्दापीठ,प्रथम श्रेणी १९२४
पदवी वांग्मय पारांगद : टीळक महाराष्ट्र विद्दापीठ, १९२६
१९२६ : कामगार नेते ना. म. जोशी यांचे खाजगी सहाय्यक म्हणून काम
१९२७ : पक्षघाताने जानेवारी मध्ये नवीदिल्ली येथे आजारी.
१९२८ :आँगस्ट, सोलापुर येथे कापड गिरणी कामगाराच्या आंदोलनाचे नेत्रत्व करतांना ७ दिवस तुरुंगवास
१९२९ : ९ जून , राष्ट्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू.
- निजाम राजवटीतील अन्याय अत्याचाराची पालकांकडून माहिती.
- अनंतराव कुलकर्णी यांच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव.
१९३२ : नारायण स्वामी यांच्याकडून सन्यासदिक्षा व स्वामी रामानंद तीर्थ हे नामकरण
१९३५ : हिप्परग्याची शाळा सोडून अंबाजोगाई येथे आगमन
- मे १९३५ मध्ये योगेश्वरी नुतन विद्दालयाचे पुनरज्जीवन
- २७ नोहेंबर १९३५ रोजी हैद्राबाद येथील शिक्षण परीषदेत मँकेझी समितीच्या अहवालावर भाषण
१९३७ : १ ते ३ जून : महाराष्ट्र परीषदेच्या परतुड येथील पहिल्या अधिवेशनास उपस्थिती
१९३८ : जून : महाराष्ट्र परीषदेच्या अस्थाई समितीचे चिटणीस म्हणून लातुर येथील दुस-या अधिवेशनात निवड
- ९ जून : योगेश्वरी शिक्षण संस्थेचा राजीनामा देवून हैद्राबादला रवाना.
*२९ जुलै : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापणा करण्याचा निर्णय.
*७ सप्टेंबर : स्टेट काँग्रेसच्या स्थापनेवर निझाम सरकारची बंदी.
१९ नोहेंबर “वंदे मातरम” चळवळीस प्रारंभ
*२४ डिसेंबर : गांधीजींच्या सांगण्यावरुन सत्याग्रह चळवळ स्थगीत
१९३९: १० एप्रील चळवळीतील अटक व सुटकेनंतर सेवाग्राम येथे गांधीजींची कार्यकर्त्यासह भेट व वैयक्तीक सत्याग्रह करण्यास परवानगी.
१९४० : १९ सप्टेंबर, सुलतान बजार येथील निवासस्थानी अटक, निझामाबाद तुरुंगात रवानगी.
१९४१ : १६ डिसेंबर, काराग्रहातुन सुटका.
१९४२ : ७ ते ९ आँगस्ट मुंबई येथील अखील भारतीय काँग्रेस महाअधिवेशनात उपस्थिती.
*आँगस्ट : नागरी स्वातंत्र्याची आणि काँग्रेसवरील बंदी उठवण्याची मागणी करणारे पत्र निझाम सरकारला देण्यासाठी जात असतांना नामपल्ली स्टेशनवर अटक, १६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा
१९४३ : डिसेंबर , काराग्रहातुन सुटका
१९४४ : १६ ते ३० मार्च , तरुण कार्यकर्त्यांसाठी हैद्राबाद येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
१९४५ : आँगस्ट, अ. भा. संस्थांनी प्रजा परीषदेच्या बैठकीत व सापोर येथील राष्ट्रीय परीषदेच्या अधिवेशनास उपस्थिती.
१९४६ : स्टेट काँग्रेसवरील संस्थानातील बंदी हुकुम उठवला.
*१९ जुलै रोजी हैद्राबाद येथे काँग्रेसच्या पहिल्या जाहीर सभेचे आयोजन.
१९४७ : १९ जून, निजामाचा भारतात सामील न होण्याची घोषणा.
- १६ १९ जून हैद्राबाद येथील चिकडपल्ली येथील स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद.
*७ आँगस्ट, “सामीलीकरण दिवस” साजरा करुन हैद्राबाद स्वातंत्रलढ्यास सुरुवात.
१५ नोहेंबर, निझामाचा भारताशी “जैसे थे” करार.
३० नोहेंबर चंचलगुडा तुरुंगातून सुटका
१८४८ : २६ जानेवारी रोजी अटक, संगारेड्डी तुरुंगात रवानगी. गुलबर्गा, हैद्राबाद तुरुंगात हलवले.
१३ सप्टेंबर, आँपरेशन पोलो स प्रारंभ
१७ सप्टेंबर निझाम सरकारची शरणागती.
हैद्राबाद संस्थान स्वतंत्र.
स्वामीजी़ची काराग्रहातुन मुक्तता.
१२ नोहेंबर : पैठण येथील पाच नाथमंदीरे हरीजणांसाठी खुले.
१९४९ : २४ नोहेंबर, भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणी हैद्राबाद संस्थानात सुरु.
१९५० : २६ जून, नांदेड येथे पिपल्स काँलेजची स्थापना.
१९५१ : १५ एप्रील, हैद्राबाद खादी समितीचे अध्यक्षपद.
१९५२ : देशातील पहिली लोकसभा अस्तित्वात.
गुलबर्गा लोकसभा मतदार संघातुन स्वामीजींची खासदार म्हणून निवड.
११ मे १९५२: प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड.
१९५३ : १६ ते १८ जानेवारी, अ. भा. काँग्रेसच्या हैद्राबाद येथील ५८ व्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.
२१ जून १९५३, लातुर येथे पुरणमल लाहोटी तंत्रशिक्षण विद्दालय स्थापण
१९५४ : स्टेट काँग्रेसचे नेत्रत्व सोडले.
१९५६ : २९ जुन रोजी अंबाजोगाई
येथे योगेश्वरी महाविद्दालयाची स्थापना
२९ जुलै, मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्दापीठाची मागणी.
१९५७ : औरंगाबाद लोकसभा मतदार संघातुन लोकसभेवर निवड.
१९५८ : मराठवाडा विद्दापीठाची स्थापना.
१९६० : १४ एप्रील, राज्य पुर्नरचना दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर.
१ मे १९६०: संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती.
१९६२ : राजकारणाचा संन्यास.
१९६३ : जुलै, हैद्राबाद लढ्याच्या नेत्रत्वाबद्दल स्वामीजींची क्रतद्न्यता व्यक्त करण्यासाठी गुलबर्गा येथे सत्कार
१९६४ : आंध्रप्रदेशातील पुर्व गोदावरी जिल्हयातील पीठापुरम येथील शांती आश्रमात प्रयाण, रामतीर्थ शांतीआश्रमाची स्थापना.
१९७० : १० फेब्रुवारी, मराठवाडा विद्दापीठाच्या “डाँक्टर आँफ लाँज”
पदवीने सन्मानीत.
१९७१ : शांती आश्रमात
-हदयविकाराने आजारी.
१९७२ : २२ जानेवारी रोजी देहवासन.
🙏🙏