महाराष्ट्र

स्वच्छता सर्वेक्षण २०२३ अभियानात अंबाजोगाई नगर परीषद देशात प्रथम

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत केंद्र शासनाच्या सहरी विकास विभागामार्फत सिटी फीडबॅक (नागरिकांचे अभिप्राय) हा उपक्रम दि. ०७ जुलै२०२३ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमात अंबाजोगाई नगरपरिषदेने देश पातळीवर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदामध्ये ३८,७०८ सिटीझन फीडबॅक नदिन राष्ट्रीयस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी नागरिकांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी शहरातील नागरिकांचे आभार मानले आहेत. तसेच या शहरातील स्वछतेच दर्जा उंचावणे यात आश्वासित केले आहे.


सिटीझन फीडबॅक (नागरिकांचे अभिप्राय) या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवल्या बद्दल मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे कार्यालय अधिक्षक शेख इफ्तेखार, नगर अभियंता विश्वनाथ लहाने, रमाकांत सोनकांबळे व सर्व टीमचे आभार मानले आहेत. या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या कर्मचाऱ्यांना नगरपरिषद अंबाजोगाई मार्फत प्रोत्साहनपर बक्षीस वितरण ही करण्यात येणार आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेला मिळालेल्या या यशाबद्दल मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, रमाकांत सोनकांबळे व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker