स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानाचा अंबाजोगाईत शुभारंभ
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_171408-1024x789.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_171408-1024x789.jpg)
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केला शुभारंभ!
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियानाचा अंबाजोगाईत शुभारंभ महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग संचालनालयाचे मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यभरात सुरु केलेल्या स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानाचा शुभारंभ राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते येथील पोतदार इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात झाला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_170731-1024x1006.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_170731-1024x1006.jpg)
या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून नोडल ऑफिसर डॉ. सिध्देश्वर बिराजदार, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, डॉ. अनिल मस्के, डॉ. सोमेश्वर चाटे, पोतदार इंग्लिश स्कूल चे प्राचार्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_170851-300x236.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_170851-300x236.jpg)
स्थूलपणा दिनाचे औचित्य साधून आज सुरु करण्यात आलेल्या स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानाचा शुभारंभ करतांना संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी राज्यातील स्थूलपणा असणा-या रुग्णांची वाढती संख्या ही चिंचेची बाब बनत चालल्याचे सांगून शालेय शिक्षणापासून माणसाच्या शरीरात शिरकाव करणारा हा स्थूलपणा त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर सतत वाढत जातो आणि शेवट तो आरोग्यास घातक ठरतो. म्हणून या स्थूलपणाच्या आजाराला वेळीच लगाम घालता यावा यासाठी राज्यभरातील प्रत्येक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची स्थूलपणा तपासणी करण्यात येवून त्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून देण्यात आले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1088901881-1677930717486-300x204.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1088901881-1677930717486-300x204.jpg)
या अभियानामुळे राज्यातील स्थूलपणा आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल असा विश्वास डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियाना बध्दल विद्यार्थ्याशी थेट संवाद साधत त्यांची वैयक्तिक मते काय आहेत हे जाणून घेतले. प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोतदार इंग्लिश स्कूल चे प्राचार्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत त्यांनी केले.
नोडल ऑफिसर डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी हे अभियान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने कशा पध्दतीने राबवल्या जात आहे याची माहिती दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी अध्यक्षीय समारोप करतांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या या अभियानात किमान ८०० विद्यार्थ्यांची तपासणी पुर्ण केली जाईल असे सांगितले.
पोतदार इंग्लिश स्कूल सोबतच शहरातील योगेश्वरी नुतन विद्यालय, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, जिल्हा परीषदेची मुलांची माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद मुलांची माध्यमिक शाळा या पाच माध्यमिक शाळेत ही या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या स्थूलपणा संदर्भातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_170815-300x184.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230304_170815-300x184.jpg)
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयात पाच स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या असून प्रत्येक टीम मध्ये १ सिनियर टीम लिडर, त्यांचे सोबत ५ पी जी रेसिडेंट आणि प्रत्येक टीमला किमान पाच परिचारीका, एक समाज सेवा अधिकारी किंवा प्रतिनिधी असा स्टाफ कार्यरत होते. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी टीम लिडर म्हणून डॉ. सोमेश्वर चाटे, डॉ. बुध्दभुषण रंगारी, डॉ. पिंगला अलाने, डॉ. अनुजा नरवडे, डॉ. सतीश चाटे यांच्यासह अनेक ज्युनिअर डॉक्टर्स, प्रशिक्षित परिचारीका, त्या त्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.