सोयाबीनच्या दरात मोठी घसरण !


सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणार एक मेजर क्रॉप. या पिकाच्या शेतीवर राज्यातील जवळपास 50 ते 60 टक्के शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या विभागात सोयाबीन पिकाची शेती केली जाते.
शिवाय गेल्यावर्षी याला चांगला दर मिळाला असल्याने यंदा सोयाबीन लागवडीचे क्षेत्र किंचित वाढले आहे. मात्र यावर्षी सोयाबीन बाजार भाव सुरुवातीपासून दबावात आहेत. चालू महिन्यात तर गेल्या महिन्याच्या तुलनेत सोयाबीन बाजार भावात 900 ते 1000 रुपयांची घसरण झाले आहे. या उलट फेरीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
आज देखील सोयाबीन बाजार भाव दबावातच होते. प्रमुख एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आतच दर मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.


कांरजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5005 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रतेक प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5225 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1988 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4601 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5651 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5126 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 500 क्विंटल सोयाबीन आवाज झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 3000 रुपये एवढा किमान दर मिळाला असून 5501 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.


नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 619 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 350 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500 प्रति क्विंतल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 633 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आलेल्या लीलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसे सरासरी दर 5225 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.


परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 285 पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी जर 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 360 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4475 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5445 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5195 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.