सिताफळ विक्री आणि प्रक्रिया व्यवस्थापनासाठी एकत्र येण्याची गरज
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_150215-1024x754.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_150215-1024x754.jpg)
सिताफळ विक्री आणि प्रक्रिया व्यवस्थापनासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सिताफळ बागायतदार संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्याम गट्टानी यांनी व्यक्त केले.
“सिताफळ” हे बीड जिल्ह्याचे वैभव असलेला रानमेवा आहे. जगभरात नावाजलेली चव, गोडी यामुळे याला भौगोलिक मानांकन सुद्धा प्राप्त (जी.आय.टॅग) आहे. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिताफळाची लागवड झाली आहे, उत्पादित सीताफळांची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळण्यासाठी सितफळा मधील उत्तम कृषी पद्धती म्हणजेच ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन होणे आवश्यक असते त्या दृष्टीने
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_145345-300x122.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230223_145345-300x122.jpg)
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प आणि मानवलोक अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सिताफळ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर उपक्रमांतर्गत पळसखेड ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सिताफळ लागवडीसाठी आणि प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी असलेल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली, सिताफळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर गोविंद मुंडे यांनी सिताफळामधील कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन संदर्भात माहिती दिली,
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230223-WA0162-1024x469.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230223-WA0162-1024x469.jpg)
मॅग्नेट प्रकल्पाचे लातूर येथील प्रकल्प अधिकारी गजेंद्र नवघरे यांनी सिताफळ प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन उद्योग उभारणीसाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत असलेल्या योजनांची माहिती दिली, डॉक्टर भगवानराव ठोंबरे यांनी सिताफळ प्रक्रिया उद्योगाच्या गरजा विषयावर चर्चा केली, सिताफळ बागायतदार संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्याम गट्टानी यांनी सिताफळ विक्री व्यवस्थापन संदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनपर कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्यक्ष सिताफळ बागेमध्ये शेतकऱ्यांना सिताफळाची छाटणी करताना घ्यावयाची काळजी संदर्भात विस्तृतपणे माहिती देऊन प्रात्यक्षिक प्रशिक्षण करून दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्तावना मानवलोकचे कृषी तंत्रज्ञान विभाग प्रमुख इरफान शेख यांनी तर सूत्रसंचालन तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी केले. कार्यक्रमाला मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, सहकार्यवाह लालासाहेब आगळे, पळसखेडा गावचे उपसरपंच अनुरथ चव्हाण, केज, परळी, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.