साधं रे मन सुरु को साध रे
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाची स्वरमयी सांगता
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221130_164901.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221130_164901.jpg)
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह म्हणजे मराठवाड्यातील रसिकांसाठी प्रति सवयी गंधर्वच जणू हा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह गेल्या 38 वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे जगविख्यात कलावंतांनी आजपर्यंत या व्यासपीठावर आपल्या कलाविष्काराने आद्यकवी मुकुंदराज स्वामी योगेश्वरी माता दासोपंत यांच्या कुशीत वाढलेल्या अंबा नगरीच्या सजग रसिकांना स्वरतालानुभूती दिलेली आहे यावर्षीचा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह जगविख्यात गायकद्वय पद्मविभूषण पंडित राजन साजन मिश्रा यांचा वारसा चालवणारे आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते पंडित रजनीश राजन मिश्रा व पंडित रितेश राजन मिश्रा यांच्या बहारदार शास्त्रीय गायनाने संपन्न झाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील अखेरच्या सत्रातील या मैफिलीची सुरुवात मराठवाड्यातील आघाडीची युवा गायिका सौ सरस्वती बोरगावकर यांच्या गायनाने झाली सरस्वतीने बागेश्री रागातील आणि झपतालातील जा जारे घर शाम ,बांट देखे जशोदा या मध्यलईतील बंदीशीने सुरुवात केली स्वच्छ स्वर भावस्पर्शी शब्दफेक यामुळे अगदी सुरुवातीलाच रसिकांच्या मनावर मजबूत पकड निर्माण झाली मध्यलयीतील बंदिशीनंतर ताल त्रिताल मधील आयोग सजाव मंदिर आज ही बंदिश सादर करत असताना नोटेशन युक्त आलापतानांच्या लय भारी ने वातावरण अगदी मंत्रमुग्ध केले. ताल त्रितालातील बंदिशीनंतर पहाडी मिश्र रागातील सर्व परिचित असणारी ठुमरी ” याद पिया की आये” सरस्वतीने सादर केली. यामध्ये कोमल शुद्ध गांधारचं मिश्रण घेताना ही जागा रसिकांना अत्यंत भावली पहाडी मिश्र मधील ही ठोंबरी सादरीकरण करत असताना प्रत्येक अंतरामध्ये समाज मालकंस चंद्रकंस अंश ध्वनी इत्यादी रागांचा मिलाफ अत्यंत श्रवणीय होता त्यानंतर जय जयवंती रागाच्या अंगाने आणखीन एक ठोंबरी अकेली डर लागे सरस्वतीने सादर केली आणि आपल्या गायनाचा समारोप तिने किशोरीताई आमोणकर यांनी अजरामर केलेल्या बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या अभंगांनी केला. सरस्वतीच्या गायनासाठी हार्मोनियम साथ या वर्षीचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार विजेते पंडित सुरमई बाबुराव बोरगावकर यांनी तर तबल्याची साथसंगत अंबरीश शीलवंत यांनी केली . त्यानंतर व्यासपीठावर जगविख्यात पंडित रजनीश व रितेश मिश्रा यांचे आगमन झाले. प्रारंभी त्यांनी कौशिक कानडा रागातील विलंबित एकताल मधील बडाखेल राजन के सिरताज राजा श्री रामचंद्र ही बंदिश अत्यंत तयारीने सादर केली. त्यानंतर मध्यले त्रिताल मध्ये दामोदर हरिनाम बोल रे निस दिन ही बंदिश घेतली त्यानंतर ताल त्रिताल मधील राग जयजयवंती सादर केला सुनी सजिया नही भाव अशी शब्दरचना असणारी बंदिश व त्यानंतर पद्मविभूषण पंडित राजन मिश्रा यांनी अगदी व्यासपीठावरच ज्याची रचना केली असा तराना अत्यंत तयारीने सादर केला . रजनीश मिश्रा यांची गायकी त्यांच्या आवाजाची डेप्थ ,स्वरांवरील ठहराव धृपद अंगाने असणारी गायकी पद्मविभूषण राजन मिश्रा यांची आठवण करून देत होती तर पंडित रितेश मिश्रा यांची गायकी पद्मविभूषण पंडित साजन मिश्रा यांच्या आठवणीमध्ये रमत होती .अंबाजोगाईतील जाणकार रसिकांनाही याचा वेळोवेळी श्रवण करत असताना प्रत्यय येत होता .या बंदिशीनंतर त्यांनी किरवाणी रागातील” साधे मन सुर को सादरे ” हे भजन सादर केले यातील ” एक मन को दुसरे मनसे बांधरे ” ही ओळ गात असताना कलावंत आणि रसिक यांच्यातील अंतर जणूकाही लुप्त झाले की काय अशी अनुभूती मिळत होती. मेघसे मल्हार ले तू या अंतऱ्यामध्ये अलगद किरवानी रागातून बाहेर पडून मल्हार मध्ये कधी प्रवेश केला आणि पुन्हा परत किरवानीचे स्वर स्मृतीसमारोहाच्या परिसरामध्ये गुंजरव घालायला लागले हे रसिकांना उमगलेच नाही इतक्या सरलतेने त्यांनी हे राग भ्रमण सादर केले. जगविख्यात ग्रामीण पुरस्काराने सन्मानित असलेले पंडित रजनीश व पंडित रितेश मिश्रा यांचे गायन ऐकणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूतीच होती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील प्रत्येक मैफल अविस्मरणीय अशीच असते कारण संयोजन करते अत्यंत चोखंदळपणे या समारोहामध्ये कलावंतांची निवड करतात ही विशेष आहे पंडित रजनीश मिश्रा यांना तितक्याच तयारीने हार्मोनियम साथ राया कोरगावकर गोवा यांनी तर पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य मयंक बेडेकर यांनी तबल्याची साथ अत्यंत तयारीने केली. समारोहाची समाप्ती प्रत्येक रसिकांनी आपल्या हृदयात स्वरांना साठवून केली. कार्यक्रमाचे प्रारंभी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीच्या वतीने सतीश नाना लोमटे यांनी सर्व कलावंतांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.