महाराष्ट्र

“सांजपाखरु” स अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन…!

अंबाजोगाई येथील प्रतिथयश पत्रकार, सामाजिक, कामगार-कष्टकरी चळवळीतील जुने नेते, गेली ४० वर्षांपासून माझ्यावर स्नेह असलेले पत्रकारितेतील माझ्या अनेक मार्गदर्शकांच्या एक असलेले माझे स्नेही, ज्येष्ठ भ्राता “सांजपाखरु”चे संपादक अशोक गुंजाळ यांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस! त्यांच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत पत्रकारितेतील माझे मित्र दैनिक पुढारी चे जिल्हा प्रतिनिधी बालाजी तोंडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर अशोक गुंजाळ यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. बालाजी तोंडे यांचा ही पोस्ट वाचकांसाठी जशीच्या तशी …. अशोक गुंजाळ यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्य आभाळभर शुभेच्छा…!

हार्दिक शुभेच्छा सर…
स्वातंत्र्याने पंचविशी ओलांडल्याचा काळातील पत्रकार, विद्यार्थी दशेपासून चळवळे तेवढेच तत्वनिष्ठ आणि कडवे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे सांज पाखरूचे संपादक Sanj Pakharu Ashok Gunjal अशोक गुंजाळ सर… कोणावर अन्याय झाला… एखाद्या बलाढ्य राजकीय नेत्याने चुकीचे काम केले… शासकीय कार्यालयात शेतकरी अथवा कामगाराची पिळवणूक झाली… अशाप्रसंगी अशोक गुंजाळ सर यांच्यात हत्तीचे बळ संचारायचे!

तत्त्वनिष्ठतेमुळे कायम फाटका खिसा असलेला हा माणूस… पुढे कोण आहे? हे न पाहता त्याला थेट भिडायचा… सांज पाखरू पेपर म्हणाल तर… ए फोर साईज पेपरवर लिहिलेला मजकूर… परंतु सांज पाखरूची लोक आतुरतेने वाट पहायचे… सांज पाखरूतील गुंजाळ सर यांच्या बातमीने भल्या भल्यांना कापरे भरायचे… सांजपाखरूच्या बातमीने एवढी खळबळ उडायची की, त्या काळात अनेकांचे सत्तेचे तक्त पलटले… अधिकाऱ्यांच्या खुर्च्या गेल्या… प्रस्थापित आमदारांचा पराभव झाला… ज्यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याची अपेक्षा केली नाही असे लोक आमदार झाले.

पत्रकारितेत हा त्यांचा दबदबा तर… चळवळीतील एक चळवळा कार्यकर्ता म्हणून… अशोक गुंजाळ हे तळागाळातील आणि वंचित उपेक्षित घटकातील लोकांना हक्काचे व्यासपीठ वाटायचे… कारण अन्याय झालेला बाजूलाच राहायचा आणि अशोक गुंजाळ हेच… सत्तेतील राजकीय नेते असो या भ्रष्ट अधिकारी अशा भल्या- भल्यांच्या थेट अंगावर जाऊन भिडायचे… सन 2010 च्या दरम्यानचा तो काळ असेल… मी पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी होतो… माझे गुरुतुल्य असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने… ए फॉर साईज पेपर वर…. एका बाजूने लिहिलेला लेख दाखवला… वर टायटल सांज पाखरू होते… मी म्हटलं हे काय आहे? ते म्हणाले अंबाजोगाईतल्या एका पत्रकाराचा हा पेपर आहे…. तुम्ही आवर्जून वाचत जा… मी तो लेख वाचला… लेखणी किती प्रकार असू शकते, हे मी त्या लेखातून अनुभवले… यानंतर जेव्हा- जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी आवर्जून सांज पाखरू वाचायचो.

अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून… अशोक गुंजाळ सर यांच्या फेसबुक वरील पोस्ट आवर्जून वाचत असतो….
आज गुंजाळ सर 73 वर्षाचे झाले असले तरी… पत्रकारिता असो या सामाजिक चळवळ… तीच उर्मी आणि अन्याविरुद्ध पेटून उठवणारी गुर्मी त्यांच्यात आहे… नव्या पिढीतील पत्रकारांना सांज पाखरू आणि अशोक गुंजाळ सर यांच्या विषयी कदाचित फारसे माहित नसेलही… परंतु इतिहासाची मागची पाने उघडून पाहिली तर… अशोक गुंजाळ सर यांच्यासारखी लेखणी असेल तर पत्रकाराच्या पेनात किती अफाट ताकद आहे, हे दिसून येईल… त्यांनी अनेक भल्याभल्यांना अंगावर घेऊन शिंगावरून फेकून दिले…. नेते, अधिकाऱ्यांच्या खुर्च्या घालवल्या… एवढी कर्तव्य कठोर पत्रकारिता असतानाही… लोकनेते गोपीनाथराव मुंडे असो या विलासराव देशमुख… अथवा विमलताई मुंदडा… अशा अनेक बलाढ्य नेत्यांशी त्यांचे कौटुंबिक ऋणानुबंध होते… हे मोठे नेते अंबाजोगाईला आले आणि अशोक गुंजाळ यांना भेटले नाहीत असे कधीच झाले नाही… खरे तर या नेत्यांच्या विरोधातही त्यांनी लिहिले… परंतु अशोक गुंजाळ सर यांच्या तत्त्वनिष्ठतेमुळे त्यांच्या ऋणानुबंधात अंतर पडले नाही.


असो, आज सांज पाखरू चे संपादक अशोक गुंजाळ सर हे 73 वर्षाचे झाले आहेत… सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!

@: बालाजी तोंडे
जिल्हा प्रतिनिधी दैनिक पुढारी, बीड
मो. 9028108210
दि. 01 ऑक्टोबर 2023

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker