अंबाजोगाई तालुक्यातील सहा वर्षीय अल्पवयीन मुलीस शेजारीच राहणार्या नराधमाने चॉकलेटचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायाधीश श्रीमती एस.जे.घरत यांनी आरोपीस वीस वर्षाची सक्त मजुरी व आकरा हजार रूपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
चॉकलेट चे आमीष दाखवून केला होता अत्याचार
अंबाजोगाई तालुक्यात राहणार्या अल्पवयीन मुलीस चॉकेलटचे अमिष दाखवून शेजारी राहणार्या विष्णु बाबुराव सादुळे याने घरात बोलवून दि.23 मार्च 2023 रोजी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर ही अल्पवयीन मुलगी घरी जावून एकटीच बसली होती. कोणासही बोलत नव्हती. तिने पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यामुळे पालकांनी तिला काय झाले तु बोलत का नाहीस, पोट कशाने दुखत आहे. असे विचारले असता तिने घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.
अत्याचाराची दुसऱ्या दिवशी दिली माहिती
घटनेच्या दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन पिढीता ही शाळेतून घरी आली. व तसाच उदास चेहर्याने घरात बसली होती. पालकांनी परत तिला काय प्रकार झाला आहे असे विचारले असता तिने दुपारी दोन ते तीन वाजता शेजारी मैत्रिणीच्या घरी खेळत असताना शेजारी राहणारा नराधम विष्णु बाबुराव सादुळे
हा तिथे आला. आणि तिला म्हणाला माझ्या सोबत चल तुला मी चॉकलेट देतो. म्हणून तिला त्याच्या जुन्या घरी घेवून गेला. घराचा दरवाजा लावून घेतला व तिच्यावर अत्याचार केला.
जीवे मारण्याची दिली होती धमकी
हा झालेला प्रकार कोणालाही सांगु नकोस नाहीतर तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. बर्दापुर पोलिसात 376, 506 भादंवी सह कलम 3.4 (2) 5 एम., 6 बाललैकिंग अत्याचार अन्वये गुन्हा नोंद होवून पुढील तपास पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पिंक पथकाकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाची संपूर्ण तपास पोलिस उपनिरिक्षक सुचिता शिंगाडे यांनी दोषारोपपत्र अंबाजोगाईतील अप्पर सत्र न्यायालय दाखल केले.
९ साक्षीदारांची तपासणी
या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अॅड.शिवाजी मुंडे यांनी नऊ साक्षीदार तपासले.
२० वर्षे सक्तमजुरी व १० हजार दंड
पिढीतेचा जवाब व इतर साक्षी पुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून नराधम आरोपीस कलम 6 बाललैगिंक अत्याचार कायद्या प्रमाणे वीस वर्षाची सक्त मजूरी व दहा हजारांचा दंड तसेच 506 भादवी प्रमाणे एक वर्षाचा कारावास व एह हजारांचा दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.जे.घरात यांनी ठोठावली.
घटनेच्या निषेधार्थ अंबाजोगाईतील विद्यार्थीनींनी काढला होता मोर्चा
सहा वर्षिय अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणार्या नराधमाने चॉकेलेटचे अमिष दाखवून अत्याचार केल्यानंतर तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती. सदरील घटना ही निंदनीय असून शहरातील सर्व शाळांच्या मुलींनी हजारोंच्या संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान विद्यार्थीनींनी नराधमास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.