सर्वसामान्य कुटुंबातील दु:खी माणसं उभी करण्यात आनंद मिळतो;दगडू लोमटे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_193433.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_193433.jpg)
स्वत: उभे रहाण्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबातील दु:की लोक उभी करण्यात आपल्याला आनंद आणि आत्मसंतुष्टी मिळते असे मत शब्द परिवार आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी व्यक्त केले.
शब्द परिवार विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना दगडू लोमटे बोलत होते. आपल्या विस्तारीत भाषणात दगडू लोमटे पुढे म्हणाले की,
मला वैयक्तिक स्वतः उभं राहण्यापेक्षा माणसं उभी करण्यात आनंद उभी करण्यात जास्त आनंद मिळतो.
जे गुण आपल्यात नाहीत व इतरांमध्ये आहेत अशा लोकांच्या पाठिशी उभे राहण्यात आनंद मिळतो. आयुष्यभर सतत नवीन काही तरी शिकत राहण्यात आनंद मला आनंद मिळतो.
कविता लिहिण्याचा मला लहाणपणापासूनच आवड होती. मी कविता ही भरपुर लिहिल्या, प्रसिद्ध ही झाल्या. हे होत असतानाच विनोद रापतवार आणि मी दोघांनी मिळून शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर शिक्षण घेत असणाऱ्या गावातील तरुणांनी लिहीलेल्या कवींना प्रसिध्दी देण्यात एक स्वतंत्र अंक काढण्याचा प्रयत्न करुन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या अंकात १६ कविता, ३ कथा आणि मोजक्या जाहिरातींचा समावेश होता. हा एक छोटा प्रयोग प्रयोग माझ्या आयुष्याला कालाटणी देवून गेला आणि माझे कविता लिहिण्याचे वेड वाढत गेले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_193648.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_193648.jpg)
माणसावरील दुखा:ची पहिली कविता लिहिली आणि ती छापून आली, त्यामुळे कवी म्हणून मला मान्यता मिळाली.
वर्तमानपत्र वाचण्याच्या छंदामुळे वाचन वाढले आणि सोबत कथा आणि कादंब-या वाचण्याची ओढ निर्माण झाली. या वाचण्यातुन एक वैचारिक बैठक निर्माण झाली. १९८३ साली अंबाजोगाईत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे मला साहित्याची ओढ निर्माण झाली.
या संमेलनानंतर साहित्यिकांना एकत्रित करून त्यांचे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याचा छंद जोपासण्याची ओढ लागली. यासर्व घडामोडी माझ्या मनावर, साहित्य प्रतिभेच्या क्षमतेवर परिणाम करीत गेल्या आणि माझी जडण घडण होत गेली. मला आयुष्यात अनेक मोठमोठ्या माणसांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. आणि या संधीचा उपयोग गावची ओळख वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग मी करीत गेलो, पुढे ही सातत्याने करीत राहणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_193620.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/IMG_20221129_193620.jpg)
शब्द परिवार अमरावती यांसंस्थेच्या विश्व साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून माझी झालेली निवड हा माझ्या आयुष्यातील एक माईल स्टोन आहे. ही निवड माझी वैयक्तिक निवड असल्याचे आपण मानत नसून ही निवड अंबाजोगाई शहराचा प्रतिनिधी म्हणून असल्याची जाणीव मला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात संतोष मोहिते यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाने झाली. आपल्या प्रास्ताविकात संतोष मोहिते यांनी या सत्काराच्या आयोजनामागील प्रयोजन सांगितले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, युवा नेते अक्षय मुंदडा, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब यांनी दगडू लोमटे यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रख्यात कवी गणपत व्यास यांनी दगडू लोमटे दगडू लोमटे यांच्या सामाजिक, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अंबाजोगाईच्या मातीचा सुगंध संपुर्ण जगभर दरवळत रहावा अशा शुभेच्छा दिल्या तर अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव शिंदे यांनी दगडू लोमटे यांच्या प्राथमिक अवस्थेतील प्रवाहापासून आज पर्यंतच्या प्रगल्भ प्रवासावर प्रकाश टाकून साहित्य, सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या दमदार वाटचालीस अंबाजोगाईकरांच्या वतीने भरभरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शहरातील साहित्य, संगीत, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक मंच, वकील, पत्रकार व मित्र परिवारातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या संपुर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अभिजित जोंधळे यांनी केले.