समन्वय व सामूहिक प्रयत्नातून कै. नाना पालकर संस्कार केंद्राची उभारणी : कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-10-at-8.11.38-AM.jpeg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Image-2022-08-10-at-8.11.38-AM.jpeg)
नांदेड प्रतिनिधी / भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या नांदेड येथील कै. नाना पालकर संस्कार केंद्राची जडणघडण समन्वय व सामूहिक प्रयत्नांतून होत आहे. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून व उपक्रममूल्य वाढवून या संस्कार केंद्रातील भौतिक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी केंद्रीय कार्यकारिणी व स्थानिक समित्या यांच्या समन्वयातून साध्य होईल असा आशावाद भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे नूतन कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी नांदेड येथे व्यक्त केला.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित नांदेड येथील कै नाना पालकर प्राथमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या नूतन कार्यकारिणीच्या हितगुज कार्यक्रमात संस्थेच्या सभासदांशी त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर होते. यावेळी संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शंकरराव लासुणे, माणिकराव भोसले, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, नांदेड स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मापारे, जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकरे यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव भोसले यांनी केले. यावेळी कै. नाना पालकर संस्कार केंद्राच्या विविध समित्यांची घोषणा त्यांनी केली. यामध्ये स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी डॉ अर्जुन मापारे, शालेय समितीच्या अध्यक्षपदी प्रा. संजय देऊळगांवकर, कार्यवाहपदी संगमेश्वर नळगीरे, शालेय समितीचे सदस्य म्हणून प्रा. डॉ. धनंजय कहाळेकर, संतोष कुलकर्णी, अनिल डोईफोडे तसेच आर्थिक समितीच्या अध्यक्षपदी प्रा. नंदकुमार साकरकर, उद्योजक गिरीश भंडारी, जगन्नाथ बिंगेवार यांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सत्कार संस्थेच्या कार्यकारिणीच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ अर्जुन मापारे, जिल्हा संघचालक डॉ सुधीर कोकरे, भाशिप्र चे माजी विद्यार्थी संतोष कुलकर्णी यांनी मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर म्हणाले, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत कार्यकारी मंडळाला एकमुखी पाठिंबा मिळाल्यामुळे संस्थेच्या विकासाची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. पंचक्रोशीमध्ये संस्कार केंद्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वच जबाबदार घटकांना काम करावे लागणार आहे. कोणत्याही संस्थेचा विकास करत असताना अव्यवहारी राहणे म्हणजे अयशस्वीतेचा खड्डा करण्यासारखे असते. भौतिक सुविधांची उभारणी करत असताना व्यवहारार्य योग्य पद्धतीचा अवलंब करून विकास साध्य केला पाहिजे. त्यासाठी संस्थेच्या सर्व जबाबदार घटकांनी आपल्या भविष्यकालीन संकल्पांची आठवण ठेवत कार्याची दृष्टी व निर्धारित लक्ष्यावर सदोदित लक्ष ठेवले पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना कांबळे,आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक बेल्के सरांनी केले. कार्यक्रमांमध्ये वैयक्तिक पद्य , वंदे मातरम्- सौ. श्रुती देशपांडे यांनी सादर केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. यशवंत जोशी, प्रलोभ कुलकर्णी, निशिकांत जोशी, हेमंत इंगळे, विक्रम खदगावे, सुमंत देशपांडे , शाळेतील सहशिक्षिका व संस्थेचे सभासदांची उपस्थिती होती.