सभापती निवडीनंतर राजकारण तापले!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_155000-883x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_155000-883x1024.jpg)
सभापती पदाचे दावेदार विद्यमान संचालक दत्तात्रय पाटील यांनी दिला राजीनामा!
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीवरुन संचालक मंडळातील राजकीय वातावरण तापले आहे. या सभागृहातील ज्येष्ठ संचालक दत्तात्रय पाटील यांनी आपले नाव वगळताच आपल्या संचालक पदाचा तातडीने राजीनामा बाजार समितीच्या सचीवांकडे पाठवून दिला आहे.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक ही प्रक्रिया सुरु झाली तेंव्हापासून गाजते आहे. ही निवडणूक लढविण्यासाठी या विभागातील सोसायटी मतदारसंघावर प्रचंड प्रभुत्व असलेले दत्तात्रय पाटील हे फारसे उत्सुक नव्हते, निवडणुक लढवायची त्यांची इच्छा ही नव्हती. मात्र महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांच्या बैठकीत बहुमत मिळाल्यानंतर त्यांना सभापती करण्याचे वचन दिले व त्यानंतर दत्तत्रय पाटील हे या निवडणुकीत सक्रिय झाले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_161441-966x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_161441-966x1024.jpg)
आपल्या मुलीच्या विवाह सोहळा अगदी तोंडावर आला असतांनाही दत्तात्रय पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला प्राधान्य देवून त्यांनी प्रचारात मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. सकाळी सात वाजता जेवण करून रात्री रात्री उशिरा पर्यंत एकाएका मतदारांची भेट घेत दत्तात्रय पाटील यांनी महाविकास आघाडीची मोट अधिक घट्ट केली. मतदान झाल्यानंतर मुलीच्या लग्नापुर्वी अवघी पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांनी आपले लक्ष लग्नगडबडीत केंद्रीय केले आणि अतिशय दिमाखदार पध्दतीत हा विवाह सोहळा पार पाडला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154254-1024x856.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154254-1024x856.jpg)
संचालक मंडळाच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यामुळे सभापती पदासाठी दत्तात्रय पाटील यांचे नांव त्यांना अश्वस्त केलेले नाव काल पर्यंत निश्चित होते. मात्र राजकारणात शेवटच्या घटकेपर्यंत काहीही होवू शकते, या म्हणीचा प्रत्यय सभापती निवडीच्या प्रक्रियेत आला. दत्तात्रय पाटील यांचे नांव अचानक मागे पडुन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण यांचे नांव सभापती पदासाठी निश्चित करण्यात आल्याचे फर्मान माजी मंत्री तथा विद्दमान आ. धनंजय मुंडे यांनी काढल्याचे सांगण्यात आली आणि दत्तात्रय पाटील यांच्या ऐवजी सभापती पदासाठी ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी आपला अर्ज भरला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154311-1024x923.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154311-1024x923.jpg)
सभापती निवडीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीत दत्तात्रय पाटील यांची अनुपस्थित हा त्यांच्या नाराजीचा सुर दाखवत होता आणि तै खरा ठरला. इकडे सभापती पदासाठी नाव वगळल्यामुळे नाराज झालेल्या दत्तात्रय पाटील यांनी सभापतीपद निवडीची प्रक्रिया पुर्ण होताच आपल्या संचालक पदाचा राजीनामा बाजार समितीच्या सचीवांकडे पाठवून दिला तर तिकडे उपसभापती पदाचे प्रबळ दावेदार सतीष सिरसाठ हे आपले नाव वगळल्यामुळे प्रचंड नाराज होता त्यांनी आपल्या नाराजीचा सुर व्यक्त करणारा आवाज मोठा केला.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154239-665x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154239-665x1024.jpg)
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवला असला तरी हा विजय फार कमी मतांच्या फरकाने मिळवलेला विजय आहे. महाविकास आघाडीच्या पॅनल मधुन संचालक मंडळातुन विजयी झालेले एक प्रमुख संचालक उमेदवार हे भाजपा प्रणीत पॅनल मधून निवडणुक लढवण्यासाठी उत्सुक होते, मात्र त्यांना तिकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने ते महाविकास आघाडीकडून विजयी झाले. त्यांची उमेदवारी जर भाजपाकडून निश्चित झाली असती तर कदाचित आजची स्थिती निर्माण ही झाली नसती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154647-1024x592.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230513_154647-1024x592.jpg)
एकुणच सभापती पदाच्या निवडीसाठी दत्तात्रय पाटील यांची उमेदवारी डावलुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपली डोकेदुखी वाढवून घेतली आहे. ज्या नेत्यांमध्ये पॅनल निवडुन आणण्याची शक्ती आहे तो नेता पॅनल उध्वस्त ही करु शकतो याची जाणीव सभापती निवडीची प्रक्रिया पुर्ण करण्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हवी होती. सभापती पदाचे नाव वगळताच आपला संचालक पदाचा राजीनामा देणारे दत्तात्रय पाटील यापुढे बाजार समितीच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.