सकाळी आठ वाजता मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडणार….!


गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या मांजरा धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया आज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मांजरा धरणात नदी पात्रातुन येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेता आज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९ वाटेच्या दरम्यान धरणाच्या एकुण १८ दरवाजांपैकी व्दारे क्रमांक १ आणि व्दार क्रमांक ६ मधुन२५ सेमी उंचीवर उघडुन मांजरा नदीपात्रात १७४७.३३ क्युसेक (४९.४८ क्युमेक्स)एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे मांजरा धरण प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीत तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन पुर नियंत्रण कक्ष, मांजरा धरण यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पाण्याचा येवा लक्षात घेऊन उघडणार दरवाजे
मांजरा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पावूस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असल्यामुळे धरणात नदीच्या पात्रातुन येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेऊन धरणाचे दरवाजे उघडावे लागतील असे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.