संस्थांतर्गत वादांमुळे टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची शिक्षण यंत्रणा विस्कळीत


गेली अनेक वर्षांपासून अंबाजोगाईच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा समजल्या जाणाऱ्या टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संस्थांतर्गत वाद विकोपाला गेला असल्यामुळे या म विद्दालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या थेट शिक्षणावर आता त्याचा विपरीत परिणाम होवू लागला आहे.
अंबाजोगाई येथील टी. बी . गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालय हे लातुर येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्यावतीने चालवण्यात येते. या महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनच या महाविद्यालयाच्या जडणघडण आणि शैक्षणिक उभारणीमध्ये प्राचार्य डॉ. बी. आय खडकभावी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्राचार्य खडकभावी यांच्या योगदानामुळेच तुटपुंज्या जागेत सुरु झालेले हे अभियांत्रिकी महाविद्यालय आज स्वतः च्या मालकीच्या जागेत प्रशस्त इमारतीसह आपली भव्यता दाखवत उभे आहे.


महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेची कसल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता या महाविद्यालयाचा शैक्षणिक आणि इंन्फ्रास्ट्रक्चरल विकास प्राचार्य खडकभावी यांच्या दुरदृष्टी नेतृत्वामुळेच झाला हे कोणाला ही मान्य करावेच लागेल. यापुर्वीच्या संस्था चालकांनी प्राचार्य खडकभावी यांच्या योगदानाची दखल घेवून संस्थेच्या कार्यकारी मंडळात त्यांना महत्वाचे स्थान दिले होते तर अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले होते.
गेली पाच वर्षांपासून या संस्थाचालकात दोन गट पडले आणि या दोन गटांतील वादाचा परिणाम येथील टी. बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासावर होण्यास सुरुवात झाली. पाच वर्षापुर्वी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शिक्षणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या महाविद्यालयाच्या प्रवेश संख्येवर आणि शैक्षणिक टक्का घसरण्यावर मोठा परिणाम होत आहे.


एकेकाळी अभियांत्रिकी शिक्षणात स्वतः चा दबदबा निर्माण करणा-या या अभियांत्रिकी महाविद्यालयाची अवस्था आज अत्यंत बिकट परिस्थितीत सुरु आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी सुरू असलेल्या संस्थाचालकांच्या अंतर्गत वादाची लढाई चॅरिटी कमिशनर, लातुर जिल्हा न्यायालय, मु़बई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सध्या सुरू आहे. या सर्व लढाईचा निर्णय जेंव्हा लागेल तेंव्हा लागेल पण या कालावधीत होणा-या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक नुकसान कसे भरुन काढणार असा प्रश्न आता या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्दार्थी पालकांसमोर उभा आहे.
विद्दमान संस्थाचालकांनी प्राचार्य खडकभावी यांचा प्राचार्य पदाचा कार्यभार काढून त्यांच्या जागी एम. जी. पोतदार यांची नियुक्ती केली. प्राचार्य खडकभावी यांनी या नियुक्तीला उच्च न्यायालयात दाद मागणारी याचिकाही दाखल केली आहे. मात्र या याचिकेचा निकाल लागण्यापूर्वीच विद्दमान संचालकांनी प्राचार्य खडकभावी यांच्या कॅबिनेट कुलुप तोडून नियमबाह्य पद्धतीने महाविद्यालयाचा कार्यभार पाहण्याचे आदेश नुतन प्राचार्य पोतदार यांना दिले आहेत.
विद्दमान संस्थाचालकांच्या या कृतीचा निषेध नोंदवण्यासाठी महाविद्यालयातील जवळपास सर्वच विभाग प्रमुखांसह कार्यालयीन कर्मचारी व अनेक सेवकांनीही शैक्षणिक कामकाजावर मागील काही दिवसांपासून बहिष्कार टाकला आहे.परिणाणी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची शिक्षण यंत्रणाच विस्कळीत झाली आहे. या विस्कळीत शिक्षण यंत्रणेचा परिणाम या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर आणि शिक्षणावर ही होत आहे.


महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या या अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थाचालकांच्या अंतर्गत वादाचा नेमका किती परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे याची पाहणी करण्यासाठी माध्यम न्युज नेटवर्क ने या महाविद्यालयाचा संपुर्ण पहाणी दौरा केला. विविध विभागांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांशी, पालकांशी, विद्यमान प्राचार्य डॉ. एम जी पोतदार आणि तत्कालीन प्राचार्य डॉ. खडकभावी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन चर्चा केली. या सर्व चर्चेचा सविस्तर तपशील पुन्हा एका भागात पाहू. मात्र ऐकेकाळी शैक्षणिक दर्जाच्या परमबिंदुवर पोहंचलेल्या या अभियांत्रिकी महाविद्यालयाची आजची अवस्था ही शिक्षणाचा आदर करणा-या आणि प्रेम करणा-या सामान्य माणसाला अस्वस्थ करणारी टाकणारी आहे.


▪️ शैक्षणिक नुकसान होवू देणार
नाही; प्राचार्य पोतदार या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. पोतदार यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली तेंव्हा अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील अडचणी सोडवण्यात ते व्यस्त होते. या महाविद्यालयाच्या एकुण परिस्थिती संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेत आहोत असा दिलासा त्यांनी दिला.