संशोधनामुळे पेरु फळ पिकात गुणवत्ता वृध्दी शक्य; प्रदीप नणंदकर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_172132-300x142.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_172132-300x142.jpg)
संशोधनामुळे पेरु पिकात गुणवत्ता वृध्दी शक्य आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी व्यक्त केले. लातचर येथील शासकीय कृषी महाविद्यालयात पेरु पिकावरील मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषि महाविद्यालयात उद्यानविद्या विभागाअंतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधनाबाबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे , तर मार्गदर्शक म्हणुन श्री. प्रदीप नणंदकर तसेच प्रा. गोविंद घार, डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ, गुंडेराव साबळे, गोकुळ पाटील, शिवाजी गिरी, गोरख गालफाडे, हनुमंत ममदे, योगीराज पिसाळ, डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. प्रशांत करंजीकर, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. पद्माकर वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_172437-1024x485.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_172437-1024x485.jpg)
मार्गदर्शनपर भाषणात प्रदीप नणंदकर म्हणाले की, कृषि शास्त्रज्ञांनी पारंपारिक भाजीपाला व फळ उत्पादनाबरोबरच नवं तंत्रज्ञानाचे संशोधन आत्मसात करून गुणवत्ता वृद्धी करावी. डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी अध्यक्षीय समारोपात पदव्युत्तर संशोधक विद्यार्थ्यांना फळांची साठवण, चव, गंध, आकारमान व चमक यात सुधारणा होण्याबाबत संशोधन करण्याच्या सूचना दिल्या. उद्यानविद्या विभागाचे प्रभारी डॉ. व्यंकट जगताप यांनी विभागात होत असलेल्या भाजीपाला, फळे व फुलांच्या संशोधन संदर्भातील आढावा सादर केला. यावेळी प्रा. गोविंद घार, डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ आणि योगीराज पिसाळ यांनी विचार व्यक्त केले. संशोधक रुपाली रिठे यांनी पेरू संशोधन तर निकिता इंगळे यांनी रंगीत पानकोबी संशोधनाचे निरीक्षणे संवादात सादर केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_172418-1024x681.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230125_172418-1024x681.jpg)
यावेळी उपस्थितांनी पेरू संशोधनाचे परीक्षण केले. या बरोबरच पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभागा अंतर्गत डॉ. दिनेशसिंह चौहान यांनी चारा पिकांचे संग्रहालय व दुग्ध पदार्थ निर्मिती संशोधन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनंत शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. दयानंद मोरे, श्रीकांत कदम, आकाश नवले, साक्षी बंड, कीर्ती गव्हाळे, सोनालीनी देवी आणि सृष्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.