संत भगवानबाबा यांच्या विचार आणि संस्कारांची मी पाईक; पंकजा मुंडे
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0278-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0278-1024x682.jpg)
राष्ट्रसंत भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातील भारजवाडी गावात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचं ग्रामस्थांनी आज वाजत-गाजत मिरवणूक काढून जल्लोषात अभूतपूर्व असं स्वागत केलं. संत भगवानबाबा यांच्या विचार आणि संस्काराची मी पाईक आहे, ते माझ्यासाठी आदर्शच आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या ८९ व्या नारळी सप्ताहाची सांगता
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0282-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0282-1024x682.jpg)
राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या ८९ व्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची सांगता आज भारजवाडी येथे भाविक भक्तांच्या अलोट गर्दीच्या साक्षीने मोठया उत्साहात संपन्न झाली, त्यावेळी पंकजाताई बोलत होत्या.या सप्ताहात सहभागी व्हावे असा या भागातील ग्रामस्थांचा खूप आग्रह होता, त्यांच्या आग्रहावरून आपण सप्ताहात सहभागी झाल्याचे त्या म्हणाल्या.
पंकजाताईंची ग्रामस्थांनी काढली रथातून मिरवणूक
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0280-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0280-1024x682.jpg)
भारजवाडी गावाने लोकनेते मुंडे साहेब आणि त्यानंतर आता पंकजाताई मुंडे यांच्यावर खूप प्रेम केले आहे. सप्ताहात उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई येणार असल्याचे समजताच त्यांच्या जंगी स्वागताची तयारी ग्रामस्थांनी केली होती. त्यांच्या स्वागताचे मोठं मोठे बॅनर व कमानी लावण्यात आल्या होत्या.गावच्या वेशीवर आगमन होताच पंकजाताईंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जेसीबीतून फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. खास सजवलेल्या रथातून वाजत-गाजत सप्ताहाच्या मंडपापर्यंत त्यांची मिरवणूक काढून अभूतपूर्व असे स्वागत झाले. सरपंच माणिक बटूळे व ग्रामस्थांनी यावेळी त्यांचा सत्कार केला.
भगवान गडाची मी पायरी…
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0283-300x200.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG-20230411-WA0283-300x200.jpg)
पंकजाताई मुंडे सप्ताहात बोलण्यासाठी उभा राहताच उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या एकच कडकडाट केला. त्या म्हणाल्या, लोकनेते मुंडे साहेब संत भगवान बाबांचे निस्सीम भक्त होते. गडाच्या विकासासाठी एक सच्चा वारकरी म्हणून त्यांनी काम केले. गडाचा सन्मान माझ्यासाठी महत्वाचा आहे, मी गडाची एक पायरी आहे. तुमच्या सर्वांची सेवा करण्याचं भाग्य मला संत भगवान बाबांच्या संस्कारामुळं लाभलं. एक भक्त म्हणून ही सेवा सदैव करत राहील असं त्या यावेळी म्हणाल्या.