संगीतमय शिव महापुराण कथेचे १२ फेब्रु. पासून अंबाजोगाईत आयोजन


अंबाजोगाई केदारेश्वर शिवालय बन्सीलाल नगर अंबाजोगाई येथे संगीतमय शिवमहापुराणपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत दररोज दुपारी अडीच ते सहा या काळात कथेचे आयोजन करण्यात आले आहे .
12 ते 18 फेब्रुवारी रोजी पं. उत्तम शास्त्री यांचे होणार कथा प्रवचन
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता कथा स्थानावरून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा कथा स्थानावरून शिवाजी चौक, बसस्थानक ,मीनाताई ठाकरे चौक या मार्गाने परत कथास्थानावर येणार आहेत. संगीतमय शिव महापुराण कथा पंडित उत्तम शास्त्री सांगितली जाणार आहे. कथाकार पंडित उत्तम उत्तम शास्त्री हे मूळ वासनी, जिल्हा शिखर राजस्थान चे रहिवाशी असून त्यांच्या मालेगाव नांदेड अकोला औरंगाबाद शुकताल (उत्तर प्रदेश) , परळी अशा विविध ठिकाणी कथा झालेले आहेत .
श्री केदारेश्वर मंदीर परीसरात होणार प्रवचन
श्री केदारेश्वर शिवालय हे दहा वर्षांपूर्वी या भागातील महिलांच्या पुढाकारातून शिवालय सेवा प्रतिष्ठान अंबाजोगाई या चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बांधण्यात आलेले भव्य मंदिर आहे. मंदिर बांधणीमध्ये महिलांच्या पुढाकार असणारे हे एकमेव मंदिर आहे. दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालणाऱ्या या कथेत दररोज झाकीया दाखवल्या जाणार असून दिनांक 19 फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.कथेसाठी 5000 पेक्षा जास्त भाविक भक्तांना बसता यावे असे भव्य सभामंडप बनवण्यात आले आहे.
केदारेश्वर भक्तांचे उपस्थित राहण्याचे आवाहन
शोभायात्रा ,संगीतमय शिव महापुराण कथा व महाप्रसादास जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन कथेचे यजमान गोविंदराव बरुळे, भोजराज तोष्णीवाल, गोपाळ प्आरीख, गुलाबचंद सारडा ,पांडुरंग पाखरे ,मनोज कालिया व शिवालय सेवा प्रतिष्ठान व केदारेश्वर भक्त मंडळ यांनी केले आहे .